माहोरा येथे दुचाकीस्वाराने धडक दिल्याने महिला जखमी, राहुल देशमुख यांच्या सतर्कतेमुळे वाचले महिलेचे प्राण. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 13 मई 2018

माहोरा येथे दुचाकीस्वाराने धडक दिल्याने महिला जखमी, राहुल देशमुख यांच्या सतर्कतेमुळे वाचले महिलेचे प्राण.

माहोरा येथे दुचाकीस्वाराने धडक दिल्याने महिला जखमी,

राहुल देशमुख यांच्या सतर्कतेमुळे वाचले महिलेचे प्राण.

ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा वानवा.



*वैद्यकीय अधिकारी यांनी रुग्णालयात लक्ष देण्याची गरज.


शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधी: दि.12/5/18: शनिवारी संध्याकाळी लग्न तिथी दाट असल्या मुळे रस्त्यावर वाहनांची बरीच गर्दी होती.संध्याकाळी साडेसात च्या सुमारास महोरा येथे एका दुचाकीस्वाराने आशा फकीरा इंगळे रा.ताडेगाव वाडी या महिलेस जोरदार टक्कर मारली आणि धूम ठोकली.थोड्या वेळात त्यांचा भाऊ नितीन म्हस्के रा.म्हसरूळ याला माहित झालं  आणि ते तिथे येवून अंबुलन्स साठी प्रयत्न करत होते.तोपर्यंत घटनास्थळी बघ्यांची आणि सेल्फी काढणाऱ्यांची तुफान गर्दी जमली होती.भोकरदन ग्रामीण रुग्णालयाला अंबुलन्स नसल्यामुळे आणि 108 वरच सगळा कारभार असल्यामुळे अंबुलन्स यायला उशीर लागत होता.तेव्हढ्यात युवक काँग्रेस चे विधानसभा अध्यक्ष राहुल देशमुख हे देऊळगाव राजा येथून एक लग्न समारंभ आटोपून दुसऱ्या लग्न समारंभात हजेरी लावण्यास भोकरदन कडे येत असताना त्यांना रत्यात गर्दी दिसली आणि त्यांनी गाडी तिथे थांबवली असता त्यांच्या निदर्शनास आले की सादर महिलेचे पायाचे हाड तुटले असून जबरदस्त मार लागला आहे अंबुलन्स ची वाट बघण्यात अर्थ नसल्यामुळे त्यांनी ताबडतोब स्वतःच्या गाडीतून अपघातग्रस्त महिलेस भोकरदन ग्रामीण रुग्णालयात आणले.भोकरदन ला पुढील उपचाराची व्यवस्था नसल्यामुळे महिलेस तात्काळ औरंगाबाद ला हलवण्यात आले.
*ग्रामीण रुग्णालयात सुविधांची वानवा*
भोकरदन ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका सदैव खराब असते तसेच अपघातग्रस्त रुग्णाला स्ट्रेचर वर टाकून महिलेच्या भावाने,देशमुख व ईश्वर जाधव यांनी स्वतः आत आणले वेळेवर शिपाई सुद्धा तिथे हजर नव्हता रुग्णालयात पाणी सुद्धा नव्हते आणि वार्डात शौचालयाचा प्रचंड वास येत होता या प्रकरणावरून राहुल देशमुख यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.या निमित्ताने ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें