जिंतूरात जन्मदात्या पित्यावर पुत्राचा भर रस्त्यावर प्राणघातक हल्यातठार!!
-जिंतूरमध्ये घडलेली दिवसाढवळ्या घटना.
जिंतूर : (पठाण अजमत)
आज जिंतुरात दिवसाढवळ्या बालपणापासून पालनपोषण केलेल्या आपल्या जन्मदात्या पित्यावर त्याच्याच एका पुत्राने धारदार शस्त्राने वार केल्याची खळबळजनक घटना हाती आलीय. या धारधार शस्त्राने वार झाले यामुळे जन्मदात्या पित्याला आपला जीव गमावल्याची वेळ आली दिवसाढवळ्या आणि भर रस्त्यावर हा थरार झाला .या जन्मदात्या पित्याने पुत्राचे वार अक्षरशः सहन केले.
जिंतूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा घडलेला प्रकार अंगावर शहारे आणणारा होय. बसस्थानकापासून महा मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या परिसरात अनेक लोकांच्या समोर हा प्रकार घडला त्यावेळेला बघ्यांची प्रचंड गर्दी असतानाही कुणीही मारेकरीला थांबवू शकले नाही
बाचाबाची कुरकुर कुरबुरी आणि भांडणातून वाद वाढत गेला. संताप बांधला गेला. दोघांच्या भांडणाचा अतिरिक्त झाला. धावून जाण्याचे प्रकारही घडल्याची शक्यता दिसत असतानाच पुत्राने रागारागात शस्त्रांचे वार सुरू केले. सहन न झाल्यामुळे जन्मदात्या पित्याने आपला जीव गमावला.
मिळालेल्या माहितीनुसार या वादाला वाहन करणीभूत आहे कर्जाचा डोंगर ही कारणीभूत आहे.
जन्मदात्या बापाने मुलाला वाहन उपलब्ध करून दिली आणि या वाहनाचा अमाप खर्चही झाला. जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी प्रवीण मोरे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें