महामार्गावरील अपघातात दोन जण ठार.देवगांवफाटा जवळची घटना.रूग्णवाहिका व अँटो मध्ये समोरासमोर टक्कर.
सेलू (प्रतिनीधी) समशेर खान.
औरंगाबाद - नांदेड या महामार्गावर देवगांवफाटा नजिक भरधाव वेगातील रूग्णवाहिका आणि ऑटो या दोण वाहणांमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात अँटोमधील दोन जण ठार झाल्याची घटना २३ मे रोजी सकाळी ६ वा. सुमारास घडली
जिंतूर येथून शेख महबूब शे.करीम पठाण व शे.रशिद शेरसूल हे दोघेजण अँटो क्रमांक एम एच २२ - ३३३६ ने मंठा कडे जात असताना औरंगाबाद कडून जिंतूर कडे जाणारी रिकामी रुग्णवाहिका क्रमांक एम.एच.२२ ए ए ३०८५ या दोघांमध्ये देवगांवफाटा नजिक २३ मे रोजी सकाळी ६ वा. सुमारास समोरासमोर धडक झाली या अपघातात शे.मेहबूब शे.करीम पठाण व शेख रशिद शे.रसुल ( रा.जिंतुर )या दोघांचा जागीच मृत्यू झाला . घटनास्थळी महामार्गाचे पोलीस कर्मचारी यांनी एन.पी. लोखंडे ,शंकर कामालवाड , बालाजी गरड यांनी काही जखमी ना उपचारासाठी व मयताचे प्रेत ग्रामीण रुग्णालय मंठा येथे शेवविच्छेदनासाठी पाठविले पुढील प्रक्रिया पोलीस स्टेशन मंठा येथे चालू होती.आपघातानंतर मात्र रूग्णवाहिका घटनास्थळी सोडून चालक फरार झाला आहे.
फोटो ओळी....औरंगाबाद -नांदेड महामार्गावरील देवगावफाटयाजवळ रुग्णवाहिकेने धडक दिल्याने ऑटोचा असा चक्काचूर झाला तर दुसऱ्या छायाचित्रात ऑटोला धडक देणारी रुग्णवाहिक.



कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें