दोन मोटार सायकलचा अपघातात दोघेजण जखमी.
जिंतूर जालना रोडवरील अकोली जवळील घटना.
*जिंतूर / निशाद आहेमद*
जिंतूर शहरातून जाणाऱ्या जालना हायवेवरील अकोली शिवारातील पुलाजवळ दोन मोटार सायकलचा अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना 8 मे जोरी रात्री 8 :30 वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की जोगवाडा येथील प्रभाकर मस्के हे आपल्या दुचाकी क्र.. वरून गावाकडे जात होते तर दगडचोप येथील विठ्ठलराव भगस आपल्या दुचाकी वरून पुंगळा येथून लग्न समारंभासाठी लागणारा कॅमेरा देण्यासाठी देवगाव फाटा येते जात होते दरम्यान अकोली शिवारातील पुलाजवळ दोघांच्या मोटारसायकल आल्या असता भरधाव वेगाने जात असलेले प्रभाकर मस्के यांच्या गाडीच्या पाठीमागून जोराचा धका लागल्याने ते दोघेजण रोडवरच कोलसळले यावेळी त्या दोघांना हाताला व पायाला गंभीर मार लागून रस्त्याच्या कडीला पडले होते यावेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे हे त्याच रस्त्यांनी जात असताना झालेला अपघात त्यांचा लक्षात आला त्यांनी तत्काळ दोन्ही जखमींना आपल्या गाडीत टाकून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले यावेळी त्यांच्यावर डॉ चव्हाण यांनी प्रथमोपचार केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें