महालिंगेश्वर विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा.
सोनपेठ(राजेश खेडकर) दि.०१मे २०१८सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र दिना निमित्त दि.०१मे २०१८ रोज मंगळवार रोजी विद्यालयाचे ध्वजारोहणाचा कार्यक्रम मुख्याध्यापक जोशी पी. एल. यांच्या हस्ते सकाळी ठीक ०७.००वाजता संपन्न झाला. सिद्धार्थ सोनाळे यांनी यावेळी महाराष्ट्र गीतगायन केले. ध्वजारोहणा नंतर लगेचच ईयत्ता पाचवी ते नववी व अकरावी (सर्व शाखेच्या) वार्षीक परीक्षेच्या निकाल पत्रकाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन नामदेव निळे यांनी केले. यावेळी दत्तराव मस्के, बसलिंगअप्पा मोडीवाले, विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें