दिनी तालीमी बोर्डाच्या माध्यमातून कोणतेही मूल प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहणार नाही - मौलाना महमूद मदनी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 1 मई 2018

दिनी तालीमी बोर्डाच्या माध्यमातून कोणतेही मूल प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहणार नाही - मौलाना महमूद मदनी.

दिनी तालीमी बोर्डाच्या माध्यमातून कोणतेही मूल प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहणार नाही - मौलाना महमूद मदनी.

नवीन पिढीला शिक्षणाचे महत्व समजावणे ही काळाची गरज - मौलाना नदीम सिद्दीकी.

मुंबई दिनांक २९ दारुल उलूम सोनोरी अकोला येथे दिनी तालीम बोर्डाच्या राज्यस्थरीय मेळाव्यात मौलाना महमूद मदनी यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले आहे कि वर्तमान काळ इस्लाम व मुस्लिमांसाठी अत्यंत नाजूक आहे. इस्लाम मिटवण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न केले जात असून. शिक्षणाच्या नावाखाली लहान मुलांच्या मनावर वेगळ्या गोष्ठी बिंबवण्याचे तसेच इस्लाम विरोधी मूल्यांचा मार्ग त्यांच्यावर ठसवण्याचा प्रयत्न केला जात आहे अशावेळी आपण जर या गोष्टींवर दुर्लक्ष केले तर आपला विनाश अटळ आहे. तसेच दिन व इमान पासून आपणास  व आपल्या पिढीला वंचित केले जाऊ शकते. अशी वेळ येऊ नये या साठी आपल्या मुलांना तसेच नवीन पिढीला दिनी तालीम शी जोडून ठेवणे गरजेचे आहे व त्या मुळे मुलांचे भवितव्य उज्वल होऊ शकेल. या साठी दिनी तालीमी बोर्ड सर्व तोपरी प्रयत्नशील असल्याचे तसेच आपण मुस्लिम त्याच वेळी होऊ शकतो ज्या वेळी अल्लाह (परमेश्वर) एक असल्याचे मानतो व पैगंबरांचा संदेश कबूल करतो व कुराण वर अमल करतो. फक्त मुस्लिमांच्या घरात जन्म घेतल्याने व मुस्लिम नाव ठेवल्याने माणूस मुस्लिम होऊ शकत नाही  धार्मिक शिक्षण घेणे ही  मुस्लिमांची ओळख आहे जो समाज आपली ओळख अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करत नाही त्याचा अंत होतो असे जमीअत  ए उलेमा ए हिंद चे जनरल सेक्रेटरी मौलाना महमूद मदनी यांनी या मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले.
             या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मौलाना नदीम सिद्दीकी यांनी ऑल इंडिया दिनी तालिमी बोर्डाच्या मोहिमे बदल माहिती देताना सांगितले कि  या मोहिमेला चालू ठेवण्या बरोबरच अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. तसेच आपल्या पिढीला प्राथमिक इस्लामी शिक्षण देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जमीअत ए उलेमाच्या कार्याचा हवाला देत. कादियानी इसाईयत शकील बिन हनीफ सारख्या लोकांचा जोरदार सामना केला आहे. या वेळी उपस्थितांना रुखी सुखी खाऊन आपल्या मुलांना शिक्षण देण्याची ग्वाही देण्यास सांगितले या वेळी मौलाना मुफ्ती रोशन कास्मी अध्यक्ष दिनी तालीम बोर्ड महाराष्ट्र यांनी आपले विचार मांडताना या मोहिमेचे व या मेळाव्याचे महत्व पटवून दिले.  यावेळी मौलाना इब्राहिम कास्मी जनरल सेक्रेटरी दिनी तालीम बोर्ड महाराष्ट यांनी सुद्धा आपले विचार  मांडताना संपूर्ण महाराष्ट्रात २८४ छोटे मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते असल्याचे सांगितले या वेळी दारुल उलूम सोनोरी येथील १३ मुलांनी पूर्ण कुराण पाठांतर केल्याच्या  सन्मानार्थ त्यांचा सत्कार करण्यात आला
           या मेळाव्यास परिसरातून सामाजिक नेते उपस्थित राहिले होते त्या मध्ये श्री माणिक राव ठाकरे उपाध्यक्ष विधान परिषद महाराष्ट आमदार श्री हरेश मारुती व श्री रवी सपुते व सामाजिक कार्यकर्ते श्री प्रकाश आंबेडकर यांनी मेळाव्यास मार्गदर्शन केले या मेळाव्यास इतर मान्यवरांबरोबर मौलाना सय्यद महमूद अली मौलाना हबिबूल रहमान कारी शमसूल हक मौलाना अब्दुल जलील मौलाना माजुद्दीन फारूकी अब्दुल रऊफ इंजिनिअर मौलाना सिराजुद्दीन कास्मी मौलाना सुहेल अथहर
कारी मोहम्मद नाझीम अन्सारी मौलाना तौसिफ़ मौलाना मोहमद तसलिम मौलाना इम्रान अशरफू जनाब अमीर अहमद मुफ्ती साजिद कास्मी मुफ्ती मोहम्मद एजाज मौलाना मोहम्मद नदीम मौलाना मोहम्मद सलीम मौलाना सद्रुद्दीन मौलाना महमूद बेग आदी मान्यवर  व्यासपीठावर उपस्थित होते . 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें