आद्यक्रांती कारक उमाजी नाईक या चित्रपटाला राज्य शासनाने त्वरीत अनुदान उपलब्ध करून द्यावे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 30 मई 2018

आद्यक्रांती कारक उमाजी नाईक या चित्रपटाला राज्य शासनाने त्वरीत अनुदान उपलब्ध करून द्यावे.

आद्यक्रांती कारक उमाजी नाईक या चित्रपटाला राज्य शासनाने त्वरीत अनुदान उपलब्ध करून द्यावे.

राज दुनबळे.
शिर्डी प्रतिनिधी/  देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वप्रथम फासावर जाणा-या आद्य क्रांतीकारक उमाजी नाईक या चित्रपटला राज्य शासनाने त्वरीत अनुदान मंजूर करावे अशी मागणी कांतीकारी रामोशी समाजाचे राज्यव्यापी प्रतिनिधीत्व करणा-या नरविर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे राज्य अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी केले आहे स्वतंत्र्यपुर्व काळात इंग्रजाविरोधात सर्व प्रथम बंड करून त्यांना सलग १४वर्ष सळो कि पळो करुन सोडणारा नरविर उमाजी नाईकांना इंग्रजांनी त्यांच्यावर विविध खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना ३फेब्रुवारी १८३२ला पुण्यात मामलेदार कचेरी  (खडकमाळ)येथे फासावर लटकावले त्यांनी हसतहसत आपले बलीदान दिले अशा आद्य क्रांतीकारकाचा खरा इतिहास सर्व सामान्यापर्यात पोहचवावा या हेतुने बर्हिजी नाईक चित्र संस्था कोल्हापूर यांनी
आद्य क्रांतीकारक उमाजी नाईक या चित्रपटासाठी तथा गीत.संगित.कलाकार इतर सर्वची दिग्दर्शक प्रताप गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तयारी पूर्ण केले आहे शासनाने इतर काही  चित्रपटाप्रमाणे याही चित्रपटाला आर्थीक मदत करावी संस्थने संस्कृती कार्य संचालनालय मुबंई कडे पाठवून त्यास मंजुरी मिळालेली आहे राज्याच्या सांस्कृतिक मंडळाने त्यास लवकर मान्यताद्यावी आशी मागणी चव्हाण यांनी केले असुन पत्रकावर राज्य संघटनेचे राज्य सरचिटणीस राजेंद्र गडकरी. देवराम गुळवे. बंडोपंत खर्डे. हर्षवर्धन चव्हाण.बाळासाहेब नाईक.संजय मुंडले.संजय शिरतार.सोमनाथ गोफणे.सुभाष जेडगुले.आमोल मंडले. विश्वनाथ मंचकुले.राजु गुरुकुले.रमेश गफले आदिचे नावे आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें