विषेश मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. जून महिण्यातही आरोग्य शिबिराचे आयोजन-सुधीर बिंदू. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 3 मई 2018

विषेश मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. जून महिण्यातही आरोग्य शिबिराचे आयोजन-सुधीर बिंदू.

विषेश मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

जून महिण्यातही आरोग्य शिबिराचे आयोजन-सुधीर बिंदू.


सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०३मे २०१८
सोनपेठ शहर व परीसरातील विषेश विद्यार्थ्यी व बालकांसाठी सुर्योदय परीवार सोनपेठ व सक्षम लातुर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०२मे  बुधवार रोजी आरोग्य व बुध्यांक तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.  लातुर येथील डॉ.नितीन आळंदकर यांनी विषेश मुलांचा बुध्यांक तपासला. सक्षम लातुर या संस्थेच्या बसवराज पैकै यांनी विषेश मुलांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली तर योगेश बुरांडे यांनी पालकांचे समुपदेशन केले. या शिबिरात सेरेब्रल पाल्सी, स्वमग्न, मतीमंद, गतीमंद विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्यात आले होते.
या विषेश मुलांची काळजी कशी घ्यावी त्यांना समाजात वावरण्या संबधी सुचना व प्रशिक्षण देण्यात आले. अशा मुलांबद्दल पालकात असलेला न्युनगंड काढण्यासाठी पालकांचेही विषेश समुपदेशन करण्यात आले. *दर महिन्याच्या पहिल्या व चौथ्या बुधवारी या शिबिरांचे सोनपेठ येथे आयोजन करण्यात आले आहे* या सोबतच सर्व प्रकारच्या विषेश मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी वेगवेगळ्या वर्गांचे आयोजन करण्यात येणार असुन जुन महिन्यात तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थित आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिबिराचे संयोजक सुधीर बिंदु यांनी दिली. सोनपेठ तालुक्यातील विषेश विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र, विमा, आरोग्य सुविधा, व फिजीओथेरेपी व ईतर उपचार सोनपेठ येथे तज्ञांच्या मार्गदर्शाखाली नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. शिबिरात पालकांनी मोठा सहभाग नोंदवला.
या शिबिरासाठी राकेश मेहता, महेश देशमुख, अशोक खोडवे, भगवान देशमुख आदींनी सहकार्य परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें