शैक्षणिक माहिती देणाऱ्या "करिअर मित्र" ची सुरूवात।
कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।
विनायकराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी करिअर मित्र या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शंकांचे निरसन करणाऱ्या काॅल सेंटर ची सुरूवात कली आहे।
विनायकराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ हेे गेल्या २६ वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी कार्यरत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व उच्च शिक्षणासाठी संस्थेने कन्नड येथे भव्य दोन महाविद्यालये सुरू केले आहेत।
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेतांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतं त्यात विविध अभ्यासक्रमांची माहिती, त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, कोणता अभ्यासक्रम कोठे उपलब्ध आहे।
अभ्यासक्रम प्रवेशासाठी लागणाऱ्या विविध कागदपत्रांची माहिती, अभ्यासक्रमासाठी उपलब्ध शासनाच्या विविध योजना, त्यासंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता कशी करावी याची माहिती, विविध स्पर्धा परीक्षांची माहिती त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता या संदर्भातील सर्व माहिती या काॅल सेंटरवर मिळेल।
या काॅल सेंटरची वेळ सकाळी १० ते सायं ५ पर्यंत अशी राहिल. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक माहितीसाठी ९०६७०३१११९ या क्रमांकावर संपर्क साधावा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन विनायकराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. किशोर पाटील यांनी केले आहे।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें