वंदे रेणुकम्,
लिंगैक्य सद्गुरू ष.ब्र.१०८ महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज बर्दापूरकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त शि.भ.प.श्री ऋषिकेश गौरशेटे यांनी लिहिलेला लेख.
सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०३मे २०१७
अखंड मंडलाकारम! व्याप्ते येण चराचरम् !!
तत् पद्म् दर्शितम् येण! तस्मै श्री गुरूवे नमः!!!
सद्गुरु स्वरूप हे अखंड आहे. त्या स्वरूपास ना आदी ना अंत आहे.
गुरू महाराजांचा जन्म कर्नाटक राज्यातील तलवारगीरी या गावी झाला. महाराजांचे शिक्षण हे बृहन्मठ होटगी येथे झाले. महाराजांचे एम.ए. (इंग्रजी) शिक्षण पुर्ण झाल्यानंतर दि.१६मे १९६४ रोजी त्यांचा पट्टाभिषेक हा बर्दापूर मठावर झाला. त्यानंतर आल्प काळात थोरले महाराज लिं.ष.ब्र १०८ सद्गुरु चन्नबसव शिवाचार्य महाराज इसवीसन १९७२ साली गंगाखेड येथिल मठात शिवैक्य झाले. त्यानंतर महाराजांनी मठा अंर्तगत विविध संस्थाची उभारणी करून समाजातील सर्व सामान्य लोकांना शिक्षणाचा फायदा घेण्यास मदत झाली. तसेच जंगम समाजातील मुलांसाठी संस्कृत पाठशाला उभारली. त्यानंतर मठाच्या अनेक शाखा मठाच्या सुधारणेचे कार्य गुरूवर्यांनी केले. त्यात प्रामुख्याने पुस, परळी, आडस, घाटनांदुर व अंबाजोगाई याचा समावेश होता. तसेच जगद्गुरू रेणुकाचार्य मुर्ती स्थापनेचा संकल्पना पूर्णत्वास नेली. विविध ठिकाणी गुरूवर्यांनी अनुष्ठानाद्वारे खऱ्या अर्थाने धर्म प्रचाराचे कार्य केले. गुरूवर्यांच्या इष्टलिंग पुजेतुन आचार मार्गाचे तंतोतंत पालन करण्यासाठी मार्गदर्शन केले जात असे. परमरहस्यात माऊली म्हणतात-
आचार मार्गाचे ठायी! राव रंक सारखाची पाही !!
मार्ग चुकता आग्रेसरही! येई नीच पदासी !!
या ओवी प्रमाणे गुरू महाराजांचे आचरण होते. त्यांनी वीरशैव आचारसंहितेचे पालन करण्यात संपूर्ण जीवन व्यतीत केले. सर्व शिवाचार्यात एक आचार निष्ठ शिवाचार्य म्हणजे सद्गुरु महाराज होते. त्यांच्या अंतःकरणात समाजातील प्रत्येका बद्दल तळमळ होती. आशा परम श्रध्देय गुरूवर्यांनी दि.१४मे २०१७ रोजी पृथ्वी नियमाने आपला स्थूल देह पंचतत्वात समर्पित केला.
आश्या साधुचे शिष्यत्व प्राप्त होऊन खऱ्या अर्थाने या देहाचे सार्थक झाले.
शेवटी एकच म्हणेल
ऋण नाहीत फिटती! कधी नव्हे तुमचे!!
या नगरीच्या भक्तावरचे!
सद्गुरु महालिंगेश्वर चरणी कोटी कोटी प्रणम!!
( शब्दांकन- शि.भ.प.श्री ऋषिकेशजी गौरशेटे)

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें