सेलूत ई--नाम लिलाव पद्धतीमुळे कृउबाने केली भुसार दुकाने बंद. किरकोळ माल विकणाऱ्या शेतकऱ्यावर उद्भवले आर्थिक संकट. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 20 मई 2018

सेलूत ई--नाम लिलाव पद्धतीमुळे कृउबाने केली भुसार दुकाने बंद. किरकोळ माल विकणाऱ्या शेतकऱ्यावर उद्भवले आर्थिक संकट.

सेलूत ई--नाम लिलाव पद्धतीमुळे कृउबाने केली भुसार दुकाने बंद.

किरकोळ माल विकणाऱ्या शेतकऱ्यावर   उद्भवले  आर्थिक संकट.



सेलू: प्रतिनिधी
समशेर खान.
शासनाच्या वतीने लागु करण्यात आलेल्या
इ - नाम च्या नियमाप्रमाणे व व्यापारी असोसिएशन च्या विरोधामुळे सेलू येथील भुसार दुकानावरील खरेदी  शनिवार दि.19मे रोजी   बंद करण्यात आल्यामुळे  शेतक-यांना आपला माल भुसार दुकान दाराना विक्री करता आला नाही.  18 मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी शासनाच्या नियम व अटी आडत व्यापाऱ्यांना किचकट  अटी लावण्यात आल्या तर  भुसार विक्रेत्यांना मात्र काहीही अटी नसल्याने  व्यापा-यानी  विरोध केल्यामुळे सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीने 19 मे पासून जवळपास दहा ते पंधरा भुसार दुकान मालकांना शेतमाल न घेण्याचे  सांगितले.  यामुळे ऐन बाजारच्या दिवशी शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना याचा  आर्थिक फटका बसला  आहे. किरकोळ शेतमाल  विक्री करणा-या  शेतकऱ्यांना आपला   शेतमाल विकून दैनंदिन गरज भागविता आली नसल्याने शेतक-यास रिकाम्या हाताने घरी परतावे लागले.  शेतकरी वर्गात या केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बाजार योजने बद्दल तीव्र संताप शेतकरी वर्ग व्यक्त करत आहेत.  शेतकरी वर्गाचा आडत दुकाना  पेक्षा  भुसार दुकानदारा कडे शेतमाल विक्री करण्याचा कल अधिक आहे. आपल्या दैनंदिन गरजेसाठी शेतकरी असे करत असत.  परंतू   शासनाच्या नियमामुळे सेलू  कृषी उत्पन्न बाजार समितीने भुसार दुकानदारांना शेतमाल घेण्या पासून अचानक रोखल्यामुळे शेतक-यांना  आठवडी बाजारच्या दिवशी  रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. शहरात जवळपास पंधरा ते वीस फडी  विक्रेते असून त्यांच्यावर  देखील या अटीमुळे  उपासमारीची वेळ उद्भवली आहे. मोंढा परिसरात एक-एक फडीवाला जवळपास 20 ते 30 क्विंटल  धान्य दररोज खरेदी करतात. शेतकरी देखील किरकोळ शेतमाल विक्री साठी  भुसार विक्रेत्याकडे माल  विक्रीस आणून आपली दैनंदिन गरज भागवतात परंतु शासनाच्या ई-नाम खरेदीच्या अटीमुळे भुसार माल विक्रेत्यावर बंधने लादुन कृउबाच्या माध्यमातून हि खरेदी बंद करण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें