सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या लेखी आश्वासनामुळे डासाळकरांचे उपोषण मागे.
विविध चार प्रकरणाच्या निपटारासह मुख्य अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई अटळ.
सेलू प्रतिनिधी
समशेर खान.
नगर पालिकेच्या विविध चार प्रकरणासंदर्भात उपोषणाचा इशारा देणाऱ्या डासाळकरांना सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित चारीही प्रकरणात अहवाल जिल्हा अधिकाऱ्याकडे पाठवून प्रकरणाचा निपटारा करण्यासंदर्भात तसेच मुख्याधिकारी देविदास जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई चा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवण्यात येईल असे लेखी पत्र मिळाल्यामुळे डासाळकर यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे
18 मे पासून उपोषणाचा इशारा डासाळकर यांनी दिला होता त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की गेल्या तीन वर्षांपासून आपले सरकार पोर्टल वरील तक्रारीची सुद्धा मुख्याधिकारी दखल घेत नव्हते तसेच जिल्हा अधिकाऱ्याकडून चालू असलेल्या इतर प्रकरणातील चौकशांच्या ही अहवाल न देता ही चौकशीला बगल देत होते त्यामुळे उपोषणाचा इशारा देणाऱ्या डासाळाकरांना उपोषणास बसण्यापूर्वीच सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी त्या आशयाचे कार्यवाही करण्या बाबत लेखी पत्र दिल्यामुळे त्यांनी उपोषण स्थगित केले दिलेल्या पत्रात सहायक जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले यांनी मुख्याधिकारी देविदास जाधव यांना 19 मे पर्यंत दिलेल्या सर्व प्रकरणातील अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करावेत असे स्पष्ट आदेश दिलेले असून उपोषणार्थींची उपोषण थांबवावे व अनुपालन अहवाल 19 मे पर्यंत सादर करावा अन्यथा आपले विरुद्ध शिस्तभंगाच्या कार्यवाही चा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल असे नमूद पत्रात दिलेले आहे
त्यामुळे डासाळकर यांनी आपले उपोषण स्थगित केलेले आहे मात्र या उपोषणाकडे व सहाय्यक जिल्हा अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्व नगरपालिका प्रशासनाचे व सेलू तील जाणकार नागरिकांचे लक्ष लागून राहिलेले आहे सदरील कार्यवाही दिलेल्या पत्रानुसार तात्काळ होईल की यापूर्वी जशी टाळाटाळ झाली त्याचीच पुनरावृत्ती होईल याबद्दल शहरात चर्चेला उधाण आले आहे मात्र या सर्व प्रकरणात संबंधितांवर कार्यवाही व्हावी हीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें