सेलूतील चिमुकले राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत चमकले आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.
सेलूतील चिमुकले नृत्य स्पर्धेसाठी परदेशात जाणार.
सेलू प्रतिनिधी
समशेर खान.
अखिल भारतीय लोक कला सांस्कृतिक मंडळ पुणे यांच्या वतीने गणेश कला क्रीडा मंच पुणे येथे 10 ते 16 मे दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सेलू येथील संघाने द्वितीय पारितोषिक पटकावले आहे
या स्पर्धेमध्ये सेलू येथील दोन्ही संघांनी सहभाग नोंदविला होता पहिल्या संघात आर्या खारकर आर्या शिकारे शिवानी शिंदे प्रतीक्षा अंभोरे प्रतीक्षा केंद्रे भावना समृद्धी जोशी अनामिका महाडिक जानव्ही पोळ वैदही कुलकर्णी श्वेता गडदे मिस्टी काला रूमणा शेख यांचा समावेश होता या संघाने लोक नृत्य सादर करून स्पर्धेचे द्वितीय पारितोषिक पटकावले र दुसऱ्या संघाने पाश्चात्त्य नृत्य सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली यामध्ये अक्षता खारकर समृद्धी वडे वंशी ता कुलकर्णी साक्षी काकडे मनीषा मगर स्नेहा धापसे मैत्री देशपांडे सोहेल सय्यद अदनान पठाण अभिजीत आळणे प्रीती मुसळे सम्यक विश्वंभर आकाश शिंदे रोहित बोरगावकर शुभम कांबळे या कलावंताचा समावेश होता या संघाला उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली
या दोन्ही संघाची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या कलावंतांना द्रोह अकॅडमी अमर ठाकूर शैलेश टकले अशोक जोगदंड बालाजी गडदे प्रीती ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले होते
पुढील स्पर्धेसाठी बँकॉक ला नृत्य स्पर्धा होणार आहे यामुळे परदेशात सेलू ची चिमुकली चमकणार असल्यामुळे सेलूत या चिमुकल्यांचे भरभरून स्वागत होत आहे व पुढील कार्यास भरभरून शुभेच्छा मिळत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें