कवी - इम्रान प्रतापगढी यांचा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते नगरपरिषदेत सत्कार सोहळा संपन्न;
शेख कलीमसिल्लोड (प्रतिनिधी)दि 04
आंतरराष्ट्रीय ख्यातनाम कवी - इम्रान प्रतापगढी (विद्रोही साहित्यिक) यांचा सिल्लोड नगरपरिषदेत सत्कार सोहळा संपन्न झाला. नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते शाल - पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कवी - इम्रान प्रतापगढी (शायर )हे बुलडाणा येथे आयोजित कार्यक्रमास जात असतांना सिल्लोड येथील नगरपरिषदेस भेट दिली असता नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत करीत सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा.मन्सूर कादरी,संजय आरके,सलिम हुसैन, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड , रईस मुजावर पठाण,राजरत्न निकम,राजू गौर, कैसर आझाद,संजय फरकाडे, सुपडू चौधरी,मनोज झंवर,शेख बाबर,सत्तार हुसैन, अकिल देशमुख,मतीन देशमुख,अबरार देशमुख, मनोहर आरके, अस्लम पठाण,अमित आरके,राजेश्वर आरके,अब्दुल बासित,जितू आरके,रवि आरके,फईम पठाण,जगन्नाथ कुदळ,अन्वर पठाण,आदिंसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें