घाटनांद्रा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी;
काँग्रेस पक्ष कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार;
शे.कलिम.
सिल्लोड (प्रतिनिधी)दि 29सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झाले असुन विजयी उमेदवारांचा सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष गांधीभवन कार्यालयात माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नुकत्याच पार पडलेल्या घाटनांद्रा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारल्याने काँग्रेस पक्ष - पदाधिकारी नागरिकांनी फटाक्यांच्या आतिशबाजीत आनंदोत्सव साजरा केला.
सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष गांधीभवन कार्यालयात माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते विजयी उमेदवार किरण फकिरराव मोरे,अक्रम हफिज देशमुख यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समीती उपसभापती नंदकिशोर सहारे ,महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार,उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ,संजय मुरकुटे,राजेंद्र बन्सोड, शिवाजी मोरे,मोहम्मद शेख भिकन,अनिस पाशू पठाण,खालीद हाफिज देशमुख,पंढरीनाथ मोरे,यासीन तडवी,युवराज मोरे,मुबीन शेख मुनीर,माजिद पठाण,मुकद्दर जुम्मा तडवी,शाहरुख पठाण,सलिम पाशू पठाण,अनिस हाफिज देशमुख यांच्यासह कार्यकर्ते - नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें