जलसंधारण कामे माथा ते पायथा करण्याची गरज - आ.अब्दुल सत्तार;
अन्वी येथे कोल्हापूरी बंधारा दुरुस्ती कामाचे उदघाटन;
शे.कलिम.
सिल्लोड (प्रतिनिधी)दि 29जलयुक्त शिवार योजना अंतर्गत सुरू करण्यात येत असलेली जलसंधारणाची कामे माथा ते पायथा करण्याची गरज असुन अधिका-यांनीही सदरील कामांच्या दर्जाकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
सिल्लोड तालुक्यातील अन्वी येथे जलयुक्त शिवार योजना अंतर्गत कोल्हापूरी बंधारा दुरुस्ती कामाचे उदघाटन माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
जलयुक्त शिवार योजना अंतर्गत कोल्हापूरी बंधारा दुरुस्ती, सिमेंट बंधारा,पाझर तलाव दुरुस्ती,नदी - नाला खोलीकरण कामे हाती घेण्यात येत आहे,पण ही कामे गाव परिसरांतर्गत पाणी पातळीत वाढ व्हावी यासाठी माथा ते पायथा प्रभावीपणे राबविल्यास या योजनेचा फायदा होणार आहे,पण अनेक गावपरिसरात ही कामे माथा ते पायथा करण्यात नसल्याचेच चित्र पाहायला मिळतआहे.कामे प्रभावीपणे राबवून घेतांना गावा - गावांतील पदाधिकारी - नागरिकांनीही या जलसंधारण कामांकडे लक्ष देऊन अधिका-यांच्या उपस्थितीत ही कामे चांगल्या दर्जाची करुन घेण्याची गरज असल्याचे मत आ.अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे,कृषी उत्पन्न बाजार समीती सभापती रामदास पाटील पालोदकर,माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे,विठ्ठलराव सपकाळ, जिल्हा परिषद सदस्या मिनाताई गायकवाड,निजाम पठाण,मधूकर गवळी,राजेंद्र बन्सोड,संजय मुरकुटे, इंजिनिअर भोसले,सोनुने,दांडगे,विनोद गायकवाड,आदिंसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें