मानवत येथे प्रधानमंञी राष्ट्रिय स्वास्थ सुरक्षा मिशनला सुरुवात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 30 मई 2018

मानवत येथे प्रधानमंञी राष्ट्रिय स्वास्थ सुरक्षा मिशनला सुरुवात.

मानवत येथे प्रधानमंञी राष्ट्रिय स्वास्थ सुरक्षा मिशनला सुरुवात.

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.३०: मानवत शहरात प्रधानमंञी राष्ट्रिय स्वास्थ सुरक्षा मिशन अंतर्गत शहरातील नागरीकांची नावे यादीत आहे अशा नागरिकांना व कुटुबातील सदस्यांना  प्रधानमंञी राष्ट्रिय स्वास्थ सुरक्षा मिशन अंतर्गत पाच लाख रुपयाचा प्रतिवर्ष आरोग्य विमा हा सरकार भरणार आसुन याची सुरुवात आज दि.३० मे पासुन राजगल्ली येथुन या अभियानाची सुरुवात करण्यात आली असुन  मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्या आदेशावरुन नगरपरिषद चे कर्मचारि वार्डनुसार नागरिकाच्या घरोघरी जाऊन नागरिकाकडुन कागदपञे जमा करीत आहे.
प्रधानमंञी राष्ट्रिय स्वास्थ सुरक्षा मिशन योजना  अंतर्गत यादीत नाव आसलेले नागरीकाचा पाच लाख रुपये प्रतिवर्ष कुंटुबाचा विमा सरकार उतरवणार आहे,या योजनेत समाविष्ट लाभार्थीना देशभरातील कोणत्याहि रुग्णालयात उपचार घेता येणार आहे,प्रत्येक कुंटुबियांचा कुटुब प्रमुख याचा राशनकार्ड नंबर व मोबाईल नंबर कर्मचारीस देने आहे,जर कुटुब प्रमुख उपलब्ध नसल्यास अन्य कुटुबातील सदस्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे या प्रकारे नागरीकांचे फार्म नगरपरिषदचे कर्मचारि भरुन घेत असुन राजगल्ली येथे न.प.चे लिपिक दिपक बालाजी सातभाई व त्यांचे सहकारि सय्यद अफसर प्रभागात फिरुन नागरीकांना भेटुन राशनकार्ड व मोबाईल नंबर घेऊन फॉर्म भरताना दिसत आहेत.
तरी प्रधानमंञी राष्ट्रिय स्वास्थ सुरक्षा मिशन या योजनाचा फायदा शहरातील नागरिकांनी घ्यावा व नगरपरिषदच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहान मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें