दत्तनगरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर रहिवाशांचे नगर परिषद मुख्याधिकार्यांना निवेदन पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी.
सेलू प्रतिनिधी.समशेर खान.सेलू शहरातील दत्तनगर भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे चार दिवसाआड पाणी येत असल्याने कृत्रिम पाणीटंचाईला दत्तनगर भागातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी नगर परिषद सेलू च्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे दत्तनगर भागांमध्ये चार दिवसाआड पाणी येत आहे पाण्याचेही वेळापत्रक सुरळीत नसल्याने परिसरातील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे भर उन्हात पाणी येत असल्याने नागरिक व महिलांना अडचणीचा सामोरा करावा लागत आहे पिण्याच्या पाण्यासाठी दत्तनगर वासियांना उन्हामध्ये वणवण भटकण्याची वेळ आली आहे पाण्याचे वेळापत्रक सुरळीत करावे आणि एका दिवसाआड पाणी सोडावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर अर्जुन बोरूळ, विशाल बागल, मुद्रिका बागल, सविता शिंदे, रुक्मिणी सोळंके, गणेश वैद्य, सुभाष वाघमारे, संतोष शिंदे, विजय शिंदे, विजय अंभोरे, राणी आवटी, गणेश गायकवाड, गोविंद खराबे, निर्मला सावंत, रेखा सावंत, आदी जवळपास पन्नास नागरिकांच्या सही आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें