सिल्लोड नगर परिषदतर्फे चर्च गेट परिसरात मोफत पाणीपुरवठा व पाणीपुरवठा टाकी भेट.
शे.कलिम.
सिल्लोड (प्रतिनिधी)दि 28सिल्लोड नगर परिषद तर्फे शहरातील चर्च गेट परिसरात मोफत पाणी पुरवठा सुरू करीत पाणीपुरवठा टाकी भेट देण्यात आली .
चर्च गेट परिसरात मोफत पाणी पुरवठा व पाण्याची टाकीचे उदघाटन नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते करण्यात आले. चर्च गेट परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत होती. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मोफत पाणी पुरवठा व पाणीपुरवठा टाकी नगरपरिषदेतर्फे भेट देण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल अग्रवाल,महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार,उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, नगरसेवक रईस मुजावर पठाण ,सत्तार हुसैन,संजय मुरकुटे,फहीम पठान, भावराव दुधे,रवि आरके आदिंसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें