उंडणगाव ते हळदा रस्त्याचे काम अंतीम टप्पात .सात गावांचा प्रश्न निकाली. आमदार अब्दुल सत्तार यांनी केली पहाणी.
शे.कलिम.
सिल्लाेड ( प्रतिनिधि)दि 28
बहुप्रतिक्षेत असलेल्या उंडणगाव ते हळदा रस्त्याचे काम गेल्या महीन्यापासुन सुरु आहे.पूर्णपने उखडलेला हा रस्ता मजबुत व्हावा यासाठी माजीमंत्री आ. अब्दुल सत्तार यांनी रसत्याची पहाणी केली .रसत्याचे काम अंतीम टप्पात असल्याने सात गावांच्या रहदारीचा प्रश्न निकाली निघाला आहे.
आ अब्दुल सत्तार यांनी कैबिनेट मंत्री असतांना सन २०१४ मधे तालुक्यातील अनेक गावातील रसत्यांच्या कामांना मंजुरी मिळाली हाेती.त्यातीलच हा एक रस्ता असून सत्ताबदल झाल्यानंतर तालुक्यातील मंजुर झालेल्या कामांना शासनाने ब्रेक लावला हाेता.यामुळे रस्ता कामांना विलंब हाेत राहीला.आ. अब्दुल सत्तार यांनी तालुक्यातील त्यांच्या काळातील मंजुर केलेले रस्ते कामांना नव्याने शासकीय प्रक्रिया करून कामांना सुरुवात करण्यात आली आहे .
रविवारी (२६)आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जलयुक्त कामांच्या उद्हाटनाचा दाैरा हाेता.याच दरम्यान त्यांनी काम सुरु असलेल्या उंडणगाव ते हळदा रस्ता कामास भेट दिली व कामांची पहाणी केली.रस्ता मजबुत व्हावा यासाठी ठेकेदाराला सुचना केली.यावेळी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष देविदास लाेखंडे,कृषी उत्पन्न बाजार समीती संचालक दामुआण्णा गव्हाणे,महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार ,माजी उपनगराध्यक्ष शंकराव खांडवे,विठ्ठलराव सपकाळ,कृष्णा उखर्डे,बाळासाहेब वाघ,जब्बार टेलर,वसईचे सरपंच सुनील सपकाळ,सरपंच मंदाबाई गवळे,संचालक ईश्वर जाधव,पाडुरंग गवळे,रामेश्वर सुरडकर,आदीसह उंडणगाव,वसई,जळकी,हळदा,डकला,सावरखेडा गावातील ग्रामस्थांची उपस्थिती हाेती.
चाैकट :- रस्ता काम वसई फाट्यापर्यंत करा - आ.अब्दुल सत्तार =दरम्यान सुरु असलेले रस्ता काम उंडणगाव ते वसई फाट्यापर्यंत व्हावे अशी मागणी परीसरातील नागरीकांची आ.अब्दुल सत्तार यांच्या कडे केली.ही वास्तव मागणी लक्षात घेत आ.अब्दुल सत्तार यांनी सदरील ठेकेदारास हे काम वसई फाट्यापर्यंत करण्यात यावे अशी सुचना केली .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें