छावा संघटनेच्या ११व्या महाअधिवेशनास भोकरदन तालुक्यातुन हजारो कार्यकर्ते जाणार........!!!-विष्णु पाटील गाढे .
शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधी : दि.29/05/2018रोजी राजीव गांधी स्टेडियम औरंगाबाद येथे होणार्या राष्ट्रीय महाअधिवेशनास भोकरदन तालुक्यातील हजारो कार्यकर्ते जाणार असल्याची माहीती छावाचे ता.अ.विष्णु पाटील गाढे यांनी दिली.राज्य सरकारची झोप उडवण्यासाठी व शेतकर्यांना स्वामिनाथन आयोग शिफारसी लागु करणे,मराठा आरक्षण शेतकर्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळावा यासह प्रमुख मागण्या या राष्ट्रीय अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.
हे महाअधिवेशन स्व.अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या प्रेरणेने व संघटणेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे यांच्यानेत्रुत्वाखाली या राष्ट्रीय महाअधिवेशनास प्रमुख उपस्थीती गुजरातचे पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल,प्रदेशाध्यक्ष भिमराव मराठे,वि.आ.प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे,छावाचे प्रदेश संघटक अप्पासाहेब कुढेकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तरी भोकरदन तालुक्यातील सर्व शाखेचे प्रमुख पदाधिकारी,कार्येकर्ते व जनतेने उपस्थीत रहावे असे आवाहन भोकरदन ता.अ.विष्णु पाटील गाढे,जिल्हा सचिव सुखदेव सिरसाठ,प्रसिद्धी प्रमुख अप्पासाहेब जाधव,न्यानेश्वर गायकवाड ,दत्ता वनार्से,गजानन घोडके आदींनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें