पालम तालुक्यात गारपीट घोटाळा उघड.एक ही गुंठा जमीन नावावर नसताना तलाठ्याने स्वतःच्या मित्रांना मिळुन दिले अनुदान. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 23 मई 2018

पालम तालुक्यात गारपीट घोटाळा उघड.एक ही गुंठा जमीन नावावर नसताना तलाठ्याने स्वतःच्या मित्रांना मिळुन दिले अनुदान.

पालम तालुक्यात गारपीट घोटाळा उघड.एक ही गुंठा जमीन नावावर नसताना तलाठ्याने स्वतःच्या  मित्रांना मिळुन दिले अनुदान.

पालम तालुक्यातील तलाठयाचे प्रताप.

गुंठाभर शेती नाही तरीही बागायतदार.

वंचीत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले मागणीचे निवेदन.


पालम (अनीस खुरेशी)
पालम तालुक्यातील मौजे उमराकाझी या गावातील तलाठी अशोक आहेर यांनी गावातील काही पुढारी व शेतकऱ्यांच्या संगनमताने गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना वगळुन भलत्याच शेतकर्‍यांना दिले याच कारणामुळे गावात तलाठी अशोक आहेर यांच्या बद्दल संताप व्यक्त होत आहे गावातील काही पुढाऱ्यांच्या संगनमताने गारपिटीचे अनुदान एकाच कुटुंबातील दहा सदस्याचे नावे लाखो रूपयांचे अनुदान टाकून दिली.उमरा गावातील परीसरात तलाठी अशोक आहिरे यांचे बाहेरगावचे मित्र नंदकुमार श्यामराव,गोवर्धन ज्ञानोबा शिंदे,ज्ञानोबा तुकाराम शिंदे,यांच्या नावे उमराकाझी परीसरात एक हि गुंठाभर जमीन नसताना बागायतदार शेतकऱ्यांच्या यादीत घेण्यात आले.शेत नसताना अनुदान मंजूर करण्यात आले. बागायतदार व कोरडवाहूच्या यादीत एकाच व्यक्तीच्या नावे दोन वेळेस टाकुन भलाताच प्रताप केला गारपिटीची यादी शेतकऱ्यांना समजताच वंचित शेतकरी संतप्त झाले.वंचित शेतकर्‍यांनी तातडीने  जिल्हाधिकारी कार्यालय गाठुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली यावेळी उमरा काझी येथील शेतकरी उत्तम किशनराव गादगे, बालाजी तुकाराम काचुळे,अकबर पैलवान,जब्बार पैलवान,अनंत उगले,पंकज चव्हाण,किशन काचुळे,अनुरथ चव्हाण,सुदाम उघले,माधव रत्न गिरी आदी शेतकरी हजर होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें