सेलूत महिलेची गळफास घेऊन आत्महत्या.
समशेर खान.
सेलू, ( बातमीदार )
शहरातील सर्वोदयनगर परिसरात राहत्या घरी एका महिलेने गुरूवारी गुरूवारी (ता.१७) रोजी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.१८) रोजी सकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली.
सदरिल घटनेचे सविस्तर वृत्त असे की,शहरातील सर्वेदय नगरातील रहिवाशी वंदना दिनेश साळवे ( वय ४२ ) यांनी राहत्या घरी शुक्रवारी सकाळी गळफास घेवून अात्महत्या केली.संबंधित मयत महिलेचा पती इ.स. २००४ साली मयत झाल्यापासून शहरातील सर्वोदयनगर येथे वडील दामोदर आश्रोबा डंबाळे यांच्यासोबत राहत होती. तीच्या उर्मिला व शिवानी या दोन मुली तीच्या सोबत राहत नसल्याने ती नेहमीच चिंतेत राहायची. गुरूवारी रात्री बारा वाजता आई आणि वडीलांसोबत जेवण झाल्यावर सर्वजण एकत्रच झोपले होते. शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता झोपलेल्या जागेवर ती दिसून आली नाही. म्हणून तिच्या आईने पतीला झोपेतून उठवून मुलीचा शोध घेण्यास सांगितले. सर्वत्र शोध घेतल्यानंतर घराच्या पाठीमागील रूममध्ये छताच्या हुकाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. मयताचे शरीर गरम लागत असल्याने तातडीने तिला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डाॅक्टर बाळासाहेब जाधव यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. वडील दामोदर डंबाळे यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वंदनाने नेमके कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली. हे स्पष्ट झालेले नाही. परंतु आत्महत्येपूर्वी हातावर नावे व चिठ्ठी लिहून ठेवली असुन सदरिल चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली असुन पोलिस तपासात नेमके काय निष्पण होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सदरिल घटनेचा बीट जमादार यु.के.लाड व उमेश बारहाते,राम हातागळे हे पुढील तपास करीत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें