भोकर येथे दोन गटात तुंबळ मारामारी . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 20 मई 2018

भोकर येथे दोन गटात तुंबळ मारामारी .

भोकर येथे दोन गटात तुंबळ मारामारी .

भोकरमध्ये क्षुल्लक कारणावरून हिंदू-मुस्लीम अशा दोन गटामध्ये हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये 4 जण जखमी झाले आहेत. दोन्ही गट भिडल्याने वातावरण तणावपूर्ण असले तरी परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पाव किलो लसनाचे पैसे घेऊन दोनशे ग्राम लसून दिल्याने वाद झाला. या वादाचे हाणामारीत रुपांतर होऊन हिंदू व मुस्लीम गट आमनेसामने आले. या हाणामारीत दोन्ही गटातील दोन-दोन जण जखमी झाले आहेत. भाजीपाला मार्केट यार्डात ही घटना घडली. हर्शद अली सादेक अली निशेद खान आयुब खान, रमेश बालाजी बरबडकर आणि पंचायच समितीच्या उपसभापतीचा भाऊ चंद्रकांत बिल्लेवाड अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींवर भोकर येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नांदेड येथे पाठवण्यातआले आहे.दरम्यान, या घटनेमुळे शहरात सध्या तणावपूर्वक वातावरण असून परिसरात पोलिस कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय वाळके शहरात तळ ठोकून असून परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. पन्नास पोलीस कर्मचारी, आठ अधिकारी व आरसीपीचे दल शहरात दक्ष ठेवण्यात आले आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें