दादासाहेब पालोदकरांनी सिंचनाचे प्रकल्प उभारुन सहकार व हरितक्रांतीचे प्रयत्न केले - नगराध्यक्ष अब्दुल समीर;
कै.माणिकराव दादासाहेब पालोदकर यांना समूर्ति दिनानिमित्त अभिवादन .
शेख कलीम
सिल्लोड : प्रतिनिधी (दि.२३ ) -
माजी मंत्री कै.माणिकराव दादासाहेब पालोदकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत लोकप्रतिनिधी म्हणून सिल्लोड मतदारसंघांतील वाडी - वस्ती - तांड्यांवरील रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देत रस्त्यांची जाळे विणलीत. पाझर तलावांची कामेही मोठ्या प्रमाणात करीत सिल्लोड शहरासह तालुक्याची तहान भागवण्यासाठी पालोद - लिहाखेडी परिसरातील खेळणा मध्यम प्रकल्पासह ईतर धरणे सिंचन प्रकल्प उभारुन एक प्रकारे या भागात सहकार व हरितक्रांती करण्याचा प्रयत्न केला असल्याचे मत नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी व्यक्त केले.
सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष कार्यालय गांधीभवनात कै.माणिकराव दादासाहेब पालोदकर यांच्या समूर्ति दिनानिमित अभिवादन करण्यात आले. नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यासह मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून आदरांजली अर्पण केली.वरील मत यावेळी बोलतांना त्यांनी व्यक्त केले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समीती सभापती रामदास पाटील पालोदकर, तालुकाअध्यक्ष देविदास लोखंडे, शहराध्यक्ष प्रा. मन्सूर कादरी, काशिनाथ पाटील जंजाळ, नंदकिशोर सहारे ,विजय आबा दौड, महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, संजय आरके, सुनिल दुधे, दामुआण्णा गव्हाणे, नरसिंगदादा चव्हाण, भिमराव काळे, शंकरराव फुले, अभय वाघ, राजूमियाँ देशमुख, राजेश पालोदे, संजय मुरकुटे, कल्याण गोडसे, पंडितराव गोडसे, विठ्ठलराव जैस्वाल, मतिन देशमुख, संजय जाधव, सुनिल साखळे, जितेंद्र आरके, निलेश अवकाळे, रंगराव जरारे, शामराव कोल्हे, पंजाबराव चव्हाण, बाजीराव वाघ, अशोक पांढरे, संजय जाधव, आप्पा हावळे, रमेश ठाकूर, नामदेवराव खंडागळे, बाळू दुधे, बाबुराव दौड, गणेश गव्हाणे, सखाराम अहिरे, राजू साठे, राहुल दाभाडे, भावराव दुधे, फईम पठाण,आदिंसह कार्यकर्ते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें