सिल्लोड नगरपरिषदेने हाती घेतलेल्या चर खोदकामाची जिल्हाधिका-यांकडून प्रशंसा;
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची खेळणा मध्यम प्रकल्पास भेट;
शेख कलीमसिल्लोड (प्रतिनिधी)दि 23
भिषण पाणीटंचाईच्या काळामध्ये नागरिकांना सर्वञ पाण्यासाठी भटकंती करावी लागत असतांना सिल्लोड नगरपरिषदेने खेळणा मध्यम प्रकल्पात " चर " खोदण्याचा अभिनव उपक्रम हाती घेऊन पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केल्याबाबत प्रशंसा करीत इतरांनीही असे उपक्रम राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले.
सिल्लोड शहराची एक लाखाहून अधिक लोकसंख्या असुन या शहराला टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे ही तारेवरची मोठी कसरत ठरली असती. हि कसरत यशस्वी होण्याची कमी शक्यता असताना पाण्यासाठीचा वणवा पेटला असता.परंतु माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी तसेच नगरपरिषदेने अत्यंत प्रभावी व कल्पक चर खोदण्याचा उपक्रम हाती घेऊन सिल्लोड शहरासह गावांच्या पाणी प्रश्नांवर मात करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. अशी प्रशंसा यावेळी केली. यावेळी ते म्हणाले मोठ्या जिद्दीने व मेहनतीने चर खोदून गाळ वर काढण्यात आला आहे , वर काढण्यात आलेला गाळ पुन्हा चरात जावू नये व मेहनत वाया जावू नये,मेहनतीवर पाणी फिरु नये करीता सदरील गाळ परिसरातील शेतक-यांनी घेऊन जावा असे आवाहन केले. याकामी स्थानिक प्रशासन व नगरपरिषदेने संयुक्तपणे जनजागरण करावे असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी यावेळी सुचविले.
यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर, उपविभागीय अधिकारी शिवाजी शिंदे , तहसिलदार संतोष गोरड,नायब तहसिलदार संजय सोनवने,महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार,उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड,माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ,सलिम हुसैन,नगरसेवक रऊफ बागवान,सत्तार हुसैन,रईस मुजावर पठाण,संजय मुरकुटे, अकिल देशमुख,जगन्नाथ कुदळ,फईम पठाण, नगरपरिषद मुख्याधिकारी सचिन तामखडे,प्रकाश बनसोड,रमाकांत बाच्छे,सुनिल गोराडे,सय्यद सलिम,गोरख,घाडगे,अताउल्लाह पठाण, पंचायत समिती - कृषी विभागाच्या कर्मचा-यांसह नागरिकांची यावेळी उपस्थिती.
शेतक-यांना मोफत गाळ घेऊन जाण्याचे आवाहन - नगराध्यक्ष अब्दुल समीर;पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सिल्लोड शहरातील नागरिकांसाठी पुन्हा नव्याने खेळणा मध्यम प्रकल्पात चर खोदकामास सुरुवात करण्यात आली असुन चर खोदकाम करताना मोठ्या प्रमाणात गाळ निघत आहे. धरणासभोवतालच्या शेतक-यांनी हा गाळ आपापल्या शेतजमीनींची सुपीकता वाढवण्यासाठी घेऊन जावे असे आवाहन नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें