बोंडअळी मदतीसंदर्भात शेतक-यांची दिशाभूल - आ.अब्दुल सत्तार. केंद्रसरकारच्या मदतीव्यतीरिक्त शेतक-यांना तात्काळ मदत करा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 14 मई 2018

बोंडअळी मदतीसंदर्भात शेतक-यांची दिशाभूल - आ.अब्दुल सत्तार. केंद्रसरकारच्या मदतीव्यतीरिक्त शेतक-यांना तात्काळ मदत करा.

बोंडअळी मदतीसंदर्भात शेतक-यांची दिशाभूल - आ.अब्दुल सत्तार.

केंद्रसरकारच्या मदतीव्यतीरिक्त शेतक-यांना तात्काळ मदत करा.

शेतक-यांना तात्काळ मदत करा अन्यथा आंदोलन उभारण्याचा आ.अब्दुल सत्तार यांचा इशारा .

सिल्लोड (संतोष लहाने ) दि 14
सरकार बोंडअळींच्या प्रादुर्भावाने झालेल्या नुकसानीपोटी शेतक-यांना आर्थिक मदत देण्यासंदर्भात एकप्रकारे दिशाभूलच करीत केंद्रसरकारच्या N.D.R.F. व बोंडअळींची नुकसान भरपाई या दोघांमध्ये काहीही संबंध नसतांना शेतक-यांची दिशाभूल करुन शेतक-यांचा हक्काचा पैसा बुडविण्याचा सरकारचा कुटील डाव असुन राज्य शासनामार्फत बोंडअळींची मदत तसेच दुष्काळग्रस्त मदतीबरोबरच पिक विमा भरलेल्या शेतक-यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी प्रसिद्धीपञकाद्वारे दिला आहे.
मागील हिवाळी अधिवेशनात बोंडअळींसंदर्भात आ.अब्दुल सत्तार यांनी आवाज उडविला होता,यासंदर्भात उत्तर देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना नुकसानभरपाईपोटी 37500 रुपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. अद्यापही या आश्वासनाची पुर्तता करण्यात आली नाही. तर दुसरीकडे केंद्र सरकारमार्फत आपत्कालीन (N.D.R.F.) परिस्थिती उद्भवल्यास आपत्कालीन निधी दिल्या जातो. तर पिकांचे नुकसान झाल्यास ज्या शेतक-यांनी पिक विमा भरला आहे त्या शेतक-यांना पिक विम्याची वेगळी मदत दिली जाते.
यावर्षी 56% टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान होऊन देखील शेतक-यांना अद्याप पिक विम्याचा दमडाही मिळालेला नाही. विमा कंपन्यांना सरकार एकप्रकारे पाठीशी घालतांना दिसत आहे. पेरणीची वेळ तोंडावर येऊन ठेपलेली असुन सततच्या नापिकी - दुष्काळीमुळे शेतकरी कर्जबाजारीपणाच्या विळख्यात सापडला आहे. या भयावह परिस्थितीत केंद्र सरकारमार्फत N.D.R.F.अंतर्गत 13500 रुपये मदत तसेच राज्य शासनामार्फत बोंडअळीसंदर्भात वेगळी आर्थिक मदत तसेच पिक विमा भरलेल्या शेतक-यांसह तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अन्यथा सरकारविरोधात जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी प्रसिद्धीपञकाद्वारे दिला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें