रमजान महिण्यात लोडसेटीग बंद करण्यांची मागणी.
राष्टृवादि अल्पसंख्याक विभागाचे कनिष्ठ अभियंतास निवेदन.
मानवत / मुस्तखीम बेलदारदि.१४: १७ मे पासुन मुस्लीम धर्मियाचा पविञ असा रमजान महिना आरंभ होत असुन या एक महिण्याच्या काळात मुस्लीम बांधव सकाळपासुन सध्याकाळ पर्यत दिवसभर उपवास (रोजा )ठेवतात सध्या उन्हाळा कडक असुन तापमान चाळीसच्यावर जात आहे यात उपवासधारकाना गर्मिचा ञास होऊ नये म्हणुन दि.१७ मे ते १७ जुनपर्यत पाळोदि येथे २४ तास विद्युत पुरवठा करावा अशी मागणीचे निवेदन मानवत येथील म.रा.वि.मं.चे कनिष्ठ अभियंता यांना राष्टृवादि अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आज दि.१४ मे रोजी देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की,१७ मे पासुन मुस्लीम धर्मियाचा पविञ असा रमजान महिना आरंभ होत असुन या एक महिण्याच्या काळात मुस्लीम बांधव एक महिनाभर पहाटे सकाळपासुन सध्याकाळ पर्यत दिवसभर उपवास ठेवतात सध्या उन्हाळा कडक असुन तापमान चाळीसच्यावर जात आहे यात उपवासधारकाना गर्मिचा व उन्हाचा ञास होऊ नये म्हणुन दि.१७ मे ते १७ जुन रमजानईद पर्यत पाळोदि ता.मानवत येथे २४ तास विद्युत पुरवठा करावा या गावातील लोडसेटीग एकमहिना बंद करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनावर राष्टृवादि कॉग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष पठाण तोफिक खान रफिक खान यांची स्वाक्षरी आहे तसेच यावेळी मतीन खान,अफसर खान,रिजवान सर,शेख हाशम,तन्वीर खान,फय्युम मौलाना आदी गावातील मुस्लीम बांधव उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें