खरिप पिकविमाच्या अनुदानापासुन शेतकरी वंचीत. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 30 मई 2018

खरिप पिकविमाच्या अनुदानापासुन शेतकरी वंचीत.

खरिप पिकविमाच्या अनुदानापासुन शेतकरी वंचीत.

◆पिकविमा उतरवुनही एक रुपयाही मिळाला नाही. 

◆शेतक-यांची कृषी आयुक्तांना तक्रार.

समशेर खान.
सेलु(प्रतिनिधि) :गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतक-यांची पिके हातची गेली. तसेच शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतक-या आपल्या खरिप हंगामातील पिकांचा विमा उतरवुन घेतला असतांना मात्र विमा कंपनीकडुन शेतक-यांना एकही रुपयाची आर्थिक मदत मिळाली नसल्याने शेतकरी आडचणीत सापडले आहेत.
                तालुक्यामध्ये गतवर्षी पिक विमा रिलायंन्स कंपनी कडुन उतरवुन घेतला होता. त्यापद्धतीने मध्यवर्ती बँक तसेच दत्तक बँकेमध्ये पिकविमाच्या हप्त्याची रक्कम भरुन घेतली होती. मात्र रिलायंन्स कंपनीकडुन उतरविण्यात आलेल्या पिकविम्याची रक्कम मिळाली नसल्याची तक्रार सोमवार 28 रोजी तालुक्यातील रायपुर येथील शेतक-यांनी कृषी आयुक्ताकडे केली आहे. या गावातील शेतक-यांनी मुग, सोयाबीन, तुर, कापुस व उडिद इत्यादी पिकांचा विमा उतरविला होता. तसेच सदरिल विम्याची रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा वालुर तसेच दैना बँक शाखा सेलु येथे प्रत्यक्ष जावुन भरली होती. तसेच रायपुर हे गाव चिकलठाणा महसुल मंडळाअंतर्गत येते व सदरील मंडऴाची आणेवारी 44 टक्के इतकी देण्यात आली आहे. तसेच खरिपाची पिके अल्प पावसामुळे वाया गेली तसेच बोंडअळीमुळे कपासी पीकांचे नुकसान झाले. आणेवारीनुसार सदरिल मंडळ हे विमा अनुदानासाठी पात्र असतांना सुद्धा काही शेतक-याना  विमा, कंपनीकडुन एक रुपयाचे सुद्धा विमा कवच मिळाले नाही. केवळ विमा कंपनीने विमा उतरवुन घेतला मात्र नुकसान झालेल्या पिकांच्या विमा रक्कम शेतक-यांना दिली नाही. वेळोवेळी सदरील शेतक-यांनी कृषी विभाग व विमा कंपनीकडे तक्रारारी देवुन सुद्धा अद्यापपर्यंत तक्रारींची दखल घेण्यात आली नाही.तसेच पिकांचा विमा उतरवुन घेतला मात्र विम्याची रक्कम शेतक-यांना दिली नसल्याने विमा कंपनी ने शेतक-यांची एक प्रकारे फसवणुक केली असुन या संदर्भात गांभीर्याने दखल घेवुन शेतक-यांना योग्य न्याय देण्याची मागणी शेतक-यांच्या वतीने करण्यात आली असुन यासाठी रामेश्वर गाडेकर, विठ्ठलराव गाडेकर, सर्जेराव गाडेकर, अमोल गाडेकर, रामेश्वर गाडेकर, रुख्मिनबाई गाडेकर, विष्णु गाडेकर आदींनी पुढाकार घेतला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें