सेलू तालुक्यात नखाते आश्रमशाळा वालूर निकालात प्रथम. बारावी निकाल : ९९.२७%
प्रतिनिधी.वालुर.
श्रीमती शांताबाई नखाते कनिष्ठ महाविद्यालय आश्रम शाळा वालूर चा बारावी परीक्षेचा निकाल ९९.२७ % लागला असून या आश्रमशाळेने निकालात सेलू तालुक्यातून प्रथम क्रमांकाचा तर आश्रमशाळा मधून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
वालूर येथील श्रीमती शांताबाई नखाते आश्रमशाळेचा कला शाखेचा निकाल १००℅ व विज्ञान शाखेचा निकाल ९८.७१% लागला आहे.१० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ५८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेत प्रथम क्रमांक दरफडे सुनील श्रीकृष्ण, द्वितीय क्रमांक बनसोडे रविंद्र महादेव ,तृतीय क्रमांक कु. वाटूरे सपना बाबासाहेब तर विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक शेवाळे आनंदा मुंजाभाऊ व अन्सारी अजमत कालीमुल्ला द्वितीय क्रमांक कुमारी रोकडे आरती रामकीशन तृतीय क्रमांक मगर अर्जुन पांडुरंग यांनी मिळविला आहे .ग्रामीण भागात या आश्रमशाळेने यावर्षी ही बारावीच्या निकालाची परंपरा कायम राखली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अनिलराव नखाते, जिल्हा परिषद परभणी उपाध्यक्षा भावनाताई अनिलराव नखाते ,समाजकल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर ,संस्थेचे संचालक अजिंक्य नखाते, गटशिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे ,रमेश सरोदे प्राचार्य रमेश नखाते, मुख्याध्यापक श्याम मचाले, सर्व प्राध्यापक व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी सत्कार करून अभिनंदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें