दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाई संदर्भात अहवाल सादर करणार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 26 मई 2018

दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाई संदर्भात अहवाल सादर करणार.

दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाई संदर्भात अहवाल सादर करणार.

मंञालयीन अव्वर सचिवांसह पथकाची खेळणा मध्यम प्रकल्पास भेट;

सिल्लोड (प्रतिनिधी) दि 26
सिल्लोड मतदारसंघांतील दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाई संदर्भात गावा- गावातील नागरिकांच्या विविध मुलभूत समस्यांसह शासनास अहवाल सादर करणार असल्याची माहिती मंञालयीन ग्रामीण पाणीपुरवठा अव्वर सचिव आत्माराम लुडबे यांनी दिली.
मुंबई मंञालयीन ग्रामीण पाणीपुरवठा अव्वर सचिवांसह पथकाने सिल्लोड शहरास पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या खेळणा मध्यम प्रकल्पासह चिंचखेडा,जांभई,गोकुळवाडी आदि गावांना भेटी देऊन दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाई संदर्भात नागरिकांच्या विविध समस्या जाणुन घेतल्या. नागरिकांनी सिल्लोड मतदारसंघांतील भयावह दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाई संदर्भात माहिती देत वाडी - वस्ती - तांड्यांवरील नागरिकांसाठी विविध मुलभूत योजना तात्काळ राबविण्यात याव्यात असी मागणी गावा - गावातील नागरिकांमधून करण्यात आली.
सिल्लोड शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या खेळणा मध्यम प्रकल्प कोरडा ठाक पडला असुन भयावह पाणीटंचाई उद्भभवली असतांना माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून पुन्हा नव्याने खेळणा मध्यम प्रकल्पात " चर " खोलीकरण कामास सुरुवात करण्यात आली आहे. या चरांना ब-यापैकी पाणी लागल्याने पाणी टंचाईवर मात करीत सिल्लोड शहरातील नागरिकांसाठी पुन्हा नव्याने नवसंजीवनी मिळाली असल्याचे समाधान नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी व्यक्त केले.
शासकीय मंञालयीन अव्वर सचिव आत्माराम लुडबे ,सुरेश अंबेकर (कक्ष अधिकारी),विजय साळुंके (सहाय्यक कक्ष अधिकारी), या शासकीय पथकाने खेळणा मध्यम प्रकल्पास भेट देऊन " चर " खोलीकरण कामाची पाहणी करीत माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या अफलातून अभिनव उपक्रमाची प्रशंसा व्यक्त केली.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे,कृषी उत्पन्न बाजार समीती सभापती रामदास पाटील पालोदकर,माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ,निजाम पठाण, राजू बन्सोड,शासकीय अधिकारी - जंजाळ, रमेश कोईलवार (कार्यकारी अभियंता),अशोक घुगे,विस्तार अधिकारी - पांडुरंग जिवरग ,व्ही. के. बोडखे, (विस्तार अधिकारी), आदिंसह पदाधिकारी - नागरिकांची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें