माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पक्ष - संघटनात्मक कार्य प्रेरणादायी - आ.अब्दुल सत्तार; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 26 मई 2018

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पक्ष - संघटनात्मक कार्य प्रेरणादायी - आ.अब्दुल सत्तार;

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पक्ष - संघटनात्मक कार्य प्रेरणादायी  - आ.अब्दुल सत्तार;

सिल्लोडला काँग्रेस पक्षाच्या वतीने गांधी भवनात विलासराव देशमुख यांची जयंती साजरी;



सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.२६ ) -

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्याचे मोलाचे कार्य केले. त्यांनी गोरगरिबांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्न केले. त्यांच्या पक्ष संघटनात्मक कार्यातूनच एकप्रकारची प्रेरणा मिळाली असल्याचे मत माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.

सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष गांधीभवन कार्यालयात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली. माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समीती सभापती रामदास पाटील पालोदकर, उपसभापती नंदकिशोर सहारे, महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, सतिश ताठे, सत्तार हुसैन, संजय मुरकुटे, राजूमियाँ देशमुख, मधुकर बेंडाळे, जगन्नाथ कुदळ, फईम पठाण, आप्पा गुळवे, एस.एल.गोराडे, रुद्राजी इंगळे, डि.के.पवार आदिंसह कार्यकर्ते - नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें