आणी अखेर मुख्याधिकार्या वर शिस्तभंगाच्या कार्यवाहीसह नपच्या तिन्ही प्रकरणात ताशेरे.
सहाय्यक जिल्हाधिकार्यानी जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्तावित केला अहवाल.
सेलू प्रतिनिधी
सेलू नगर परिषदेच्या विविध चौकशी प्रकरणात मुख्याधिकारी नगरपरिषद सेलू हे गेल्या अनेक वर्षांपासून अहवाल देण्यासाठी टाळाटाळ करत होते मात्र चौकशी अधिकारी म्हणून नेमलेल्या सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित तिन्ही प्रकरणांमध्ये नगरपरिषदेवर कडक ताशेरे ओढले असून सदरील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सर्व प्रकरणांमध्ये दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही न केल्यामुळे प्रशासकीय कार्यवाहीस सहकार्य न करणे व प्रकरण जाणून बुजून विलंब करणे यासाठी नगरपरिषद सेलु चे मुख्याधिकारी देविदास जाधव यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही प्रस्तावित करण्यात यावी असा स्पष्ट अहवाल जिल्हा अधिकाऱ्याकडे सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिनांक 25 मे रोजी पाठवला आहे तसेच सदरील प्रकरणात एका माजी मुख्याधिकारी यासह माजी नगराध्यक्ष व दोन आजी-माजी सदस्यावर कार्यवाही करण्याचा प्रस्ताव देखील जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला आहे
याबाबतचे वृत्त असे की इसवी सन 2016 मध्ये दिलीप डासाळकर यांनी मंत्रालयात तक्रार केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने तसेच आपले सरकार पोर्टल वर देखील तक्रार केली होती या दोन्ही प्रकरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार याबाबत चौकशी करून अहवाल देण्याबाबत पत्र दिले होते मात्र या पत्राची दखल नगरपरिषदेचे आजपर्यंतचे मुख्याधिकारी तसेच संबंधित कर्मचारी चौकशीला प्रतिसाद देत नव्हते लेखे उपलब्ध करून देत नव्हते त्यामुळे सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी नपला मालमत्ता हस्तांतरण अधिनियमान्वये मालकीहक्क हस्तांतरीत करावयाचे असल्यास शासनाची मान्यता घ्यावी लागते ती दिसून येत नाही तसेच ठराव क्रमांक 259 दिनांक 1998 नुसार मालमत्तेचा ताबा का घेतला नाही ? तसेच त्या मालमत्तेचा ताबा घेऊन प्रकरण बंद करणे अपेक्षित होते बंद करणे होते तसे का झाले नाही त्यामुळे महसुली उत्पन्नात घट झाली आहे याची जबाबदारी कोणाची याचा स्वयं स्पष्ट अहवाल सादर करावा अशा प्रकारचे अनेक ताशेरे ओढले असून 1998 पासूनच आजपर्यंत कार्यवाही न केलेल्या ुख्य अधिकार्यांवर शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात यावी तसेच सध्याचे मुख्याधिकारी देविदास जाधव यांच्याविरुद्ध प्रशासकीय कामे विहित कालावधीत न केल्यामुळे कार्यवाही करण्यात यावी
तसेच सेलू नगर परिषद हद्दीतील सर्वे नंबर 232/1 मधील नियमानुसार सोडावं लागणार या मोकळ्या जागेवर 23 अनाधिकृत भूखंड पाडून विक्री केल्याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी व मूळ जमीन मालक, संबंधित कर्मचारी यांचे विरुद्ध या mrtp act कलम 52 गुन्हा दाखल करण्यात यावा
तसेच आदर्श नगर मधील प्लॉट क्रमांक 271 /2 व 232 यांच्यासह अनेक नगर परिषद च्या मोकळ्या जागा माजी अध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावे सदर जागा हडप केल्या असून त्याबाबतचे कुठलेही अभिलेखे उपलब्ध करून न दिल्यामुळे या तिन्ही प्रकरणात सध्याचे मुख्याधिकारी देविदास जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी असा प्रस्ताव सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे
सदरील तिनेही प्रकरण मध्ये दिलीप डासाळकर यांनी तक्रारी केल्या होत्या तसेच जिल्हा अधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी या दोघांनीही अनेक वेळा स्मरणपत्रे देऊन संबंधित प्रकरणाचा अहवाल न दिल्यामुळे दिनांक 18 मे रोजी डासाळकर यांनी उपजिल्हाधिकारी सेलू यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता त्यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी डासाळकर यांचे उपोषण मागे घेण्याकरिता मुख्याधिकारी यांनी अहवाल द्यावा अन्यथा आपल्या व शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यामुळे डासाळकर यांनी उपोषण मागे घेतले होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें