विधानपरिषद निवडणूक निकाल 2018 : संपूर्ण निकाल. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 24 मई 2018

विधानपरिषद निवडणूक निकाल 2018 : संपूर्ण निकाल.

विधानपरिषद निवडणूक निकाल 2018 : संपूर्ण निकाल.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या 6 पैकी 5 जागांचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये शिवसेने 2, भाजपने 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर बाजी मारली आहे..


वि.प्रतिनिधी.समशेर खान.
*अमरावतीत* काँग्रेसला जबर धक्का मिळाला. कारण अमरावतीत काँग्रेसची स्वत:ची 128 मतं असताना काँग्रेस उमेदवाराला केवळ 17 मतं मिळाली. त्यामुळे भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी 458 मतं मिळवत मोठा विजय मिळवला.

*नाशिकमध्ये* शिवसेनेने बाजी मारली. पालघरचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या भाजपला हा मोठा दणका आहे. कारण सेनेच्या नरेंद्र दराडे यांनी जवळपास 200 मतांनी विजय मिळवला.

*रायगडमध्ये* राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या राजीव साबळे यांचा पराभव केला

*परभणी-हिंगोली* मतदारसंघात शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांनी विजय मिळवला. त्यांना 256 मतं मिळाली. तर काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुरेश देशमुख यांच्या पदरात 221 मतं पडली.

*वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली* स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या जागेवर भाजपच्या रामदास आंबटकर यांनी विजय मिळवला. रामदास आंबटकर यांना 550 मतं मिळाली. तर काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ हे 462 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें