मुख्याधिकारी कडून शासनाची व जनतेची दिशाभूल. खासगी वाहनांवर महाराष्ट्र शासन लोगो टाकुन सर्रास गैरवापर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 14 मई 2018

मुख्याधिकारी कडून शासनाची व जनतेची दिशाभूल. खासगी वाहनांवर महाराष्ट्र शासन लोगो टाकुन सर्रास गैरवापर.

मुख्याधिकारी कडून शासनाची व जनतेची दिशाभूल.

खासगी वाहनांवर महाराष्ट्र शासन लोगो टाकुन सर्रास गैरवापर.


सेलू प्रतिनिधी
समशेर खान.
सेलू येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी स्वतःच्या खाजगी वाहनांवर महाराष्ट्र शासनाचा लोगो टाकून सर्रासपणे गैरवापर करत असून शासनाची व जनतेची दिशाभूल करत आहेत याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सेलू येथील दिलीप डासाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे याबाबत माहिती पुढीलप्रमाणे सेलू नगर परिषदेचे मुख्याधिकारी देविदास जाधव हे स्वतःचे खाजगी वाहन ज्याचा क्रमांक.एम.एच.25 आर .9470 असून सदर गाडी पूर्णतः खाजगी असतानाही त्यावर महाराष्ट्र शासनाचा लोगो टाकून सर्रासपणे या गाडीचा गैरवापर केला जात आहे सदर वाहन जप्त करून आजवर केलेल्या  सर्व खर्च व भत्त्यासह वसुली करण्यात यावी वस्तुतः मुख्याधिकारी यांना शासकीय वाहन नाही त्यामुळे वाहन चालकाला वेगळा भत्ता देण्याची गरज नाही मात्र सदरील वाहनाचे इंधन व इतर भत्ते शासनाकडून लूट केली जात असताना संबंधित मुख्याधिकारी वर कलम 420 468 409 34 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे दिलीप डासाळकर यांनी केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें