ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी होतेय गैरसोय. अनेक दिवसापासून रुग्णालयाकडून होत होती गैरसोय. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 21 मई 2018

ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी होतेय गैरसोय. अनेक दिवसापासून रुग्णालयाकडून होत होती गैरसोय.

ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी होतेय गैरसोय.

अनेक दिवसापासून रुग्णालयाकडून होत होती गैरसोय.

 वैद्यकीयधिकाऱ्यांनी लक्ष  देण्याची गरज.

व्यवस्था करण्याची पवनपुत्र सेवाभावी संस्थेची मागणी.

प्रतिनिधी-शे.सलिम.
भोकरदन येथे तालुक्याच्या ठिकाणी असलेले ग्रामीण रुग्णालयामध्ये सद्यःस्थितीला रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने रुग्णांची,बालकांची, गरोधर महिलांची,वृद्धांची अतिशय गैरसोय होत आहे. एकीकडे तापमान हे 42 सेल्सिअस पर्यँत असतांना रुग्ण हे बाहेर गावातून तसेच ग्रामीण भागातून येत असतात.रुग्णालयात रुग्णांसाठी पाण्याची व्यवस्था नसणे हि गोष्ट लाजिरवाणी असून प्रशासनाने त्वरित रुग्णालयात पाण्याची व्यवस्था करावी नसता एखाद्या रुग्णास काही नुकसान झाल्यास याची जबाबदारी रुग्णालयावर तसेच प्रशासनावर राहील असा इशारा संस्थेच्या वतीने देण्यात आला.
भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथील पवनपुत्र सेवाभावी संस्थेच्या वतीने उपविभागीय अधिकारी हरीशचंद्र गवळी यांना निवेदन देऊन मागणी केली.
या निवेदनावर संस्थेचे अध्यक्ष अनिल भुतेकर,सचिव संदिप भोकरे,नारायण लोखंडे,अर्जुन खांडवे,दिपक जाधव,समाधान लोखंडे आदींच्या सह्या आहेत.

प्रतिक्रिया- रुग्णालयात आरोग्य अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. जर पाण्याची व्यवस्था केली नाही तर आरोग्य अधिकारी यांना पाण्यासाठी वणवण फिरण्यास भाग पाडू .अनिल भुतेकर-संस्थाअध्यक्ष

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें