माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यामुळेच संगणक प्रणालीस चालना - नगराध्यक्ष अब्दुल समीर;
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन;
सिल्लोड : प्रतिनिधी.शे.कलिम. ( दि.२१) -
भारत देशाला संगणकीय युगाचा कानमंत्र देणारे असे संगणकीय युगाचे पुरस्कर्ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या समूर्ति दिनानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन करतांना नगराध्यक्ष अब्दुल समीर त्यांच्या समूर्तींना उजाळा देतांना म्हणाले देशात त्या काळात त्यांनी सर्व प्रथम संगणक प्रणालीला चालना देण्याचे काम केल्यानेच आज जग सर्वच बाबतीत प्रगतीपथावर असून संगणकामुळे जगाचे अंतर कमी होऊन या माध्यमातून खुपच जवळ आले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सिल्लोड येथील काँग्रेस पक्षाचे कार्यालयात गांधी भवनात देशाची एकता व अखंडततेसाठी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करत राष्ट्रप्रति स्वताला झोकून देणारे व संगणकीय युगाच्या माध्यमातून देशाला पुढे नेणारे माजी पंतप्रधान शाहिद राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलतांना त्यांनी त्यांच्या देशाच्या विकास कर्यांच्या आठवनींना उजाळा देत बोलते केले.
यावेळी शहराध्यक्ष प्रा.मन्सूर कादरी, महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार, सलिम हुसैन, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, संजय आरके, राजू बागवान, राजरत्न निकम, मनोज झंवर, राजू गौर, संजय मुरकुटे, कुणाल सहारे, मानसिंग राजपूत, सखाराम अहिरे, अब्दुल बासित, मनोहर आरके, राजेश्वर आरके, पंडितराव गोडसे, जगन्नाथ कुदळ, नामदेव खंडागळे, फईम पठाण, भावराव दुधे, रवि आरके, पंकज दांडगे, रुपेश साळवे, आकाश आरके आदिंसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें