एक सिमेंट बंधारा उभारुन अख्खा गाव पाणीदार होईल कसा ?
आ.अब्दुल सत्तार यांनी काढले जलयुक्तचे वाभाडे...!
सिल्लोड (प्रतिनिधी) दि 30जलयुक्त शिवार योजना अंतर्गत निवड करण्यात आलेल्या गावा - गावांत सिमेंट बंधारा बांधकाम तसेच कोल्हापूरी बंधारा - पाझर तलाव दुरुस्ती - नदी - नाला रुंदीकरणासह अनेक कामे हाती घेण्यात येणार असली तरी जलयुक्त शिवार योजना अंतर्गत निवड करण्यात आलेल्या प्रत्येक गावात एक - दोन सिमेंट बंधारा उभारण्यात येणार असल्याने प्रशासनास प्रत्येक गावात किमान पाच सिमेंट बंधारा कामे करण्यात यावी असी मागणी करण्यात आली असतांनाही टाळाटाळ करण्यात येत असल्याचे मत माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी व्यक्त करीत सरकारविरोधात नाराजगी व्यक्त केली.
सिल्लोड तालुक्यातील पिंप्री परिसरात जलयुक्त शिवार योजना अंतर्गत सिमेंट बंधारा कामांचे उदघाटन माजीमंञी आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी ते बोलत होते.
जलयुक्त शिवार योजना अंतर्गत निवड करण्यात आलेल्या प्रत्येक गावात कमीत कमी पाच सिमेंट बंधारा कामे करण्यात यावी तसेच गाव परिसरातील माथा ते पायथा कामे करण्यात यावीत असी मागणी प्रशासनाला करण्यात आली असतांना या मागणीकडे एकप्रकारे जाणुनबुजून दुर्लक्ष करण्यात आले आहे. जलयुक्त शिवार योजना अंतर्गत निवड करण्यात आलेल्या प्रत्येक गावात एक - दोन सिमेंट बंधारा उभारुन गाव पाणीदार होईल कसे असा सवाल व्यक्त करीत माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी जलयुक्त शिवार योजना अंतर्गत कामांवर नाराजगी व्यक्त केली.
सिमेंट बंधारा कामांचे उदघाटन माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समीती उपसभापती नंदकिशोर सहारे,शांतीलाल अग्रवाल , सतिश ताठे महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार,उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड,दामुआण्णा गव्हाणे,हनिफ मुल्तानी,संजय मुरकुटे,जमिर मुल्तानी,गुलाबराव मिरगे,कृष्णा लोखंडे,अक्षय मगर,नाना कळम , नाना गुरुजी लघु सिंचन अधिकारी सोनुने,दांडगे,आदींसह नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें