सारोळा येथील स्मशानभूमी सुशोभिकरण कामाचे उदघाटन;
सिल्लोड (प्रतिनिधी)दि 26जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग अंतर्गत सारोळा येथील स्मशानभूमी सुशोभिकरण कामाचे उदघाटन माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांचे हस्ते करण्यात आले. या कामाकरीता अंदाजे पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
उदघाटनप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे,कृषी उत्पन्न बाजार समीती सभापती रामदास पाटील पालोदकर,माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे,विठ्ठलराव सपकाळ, जिल्हा परिषद सदस्या मीनाताई विनोद गायकवाड, निजाम पठाण,सरपंच - मच्छींद्र दांडगे,उपसरपंच श्रीरंग वाघ, शादिक सय्यद,गजानन काकडे,ज्ञानेश्वर वराडे,सुभाष काकडे,भारत गायकवाड,उखर्डू साळवे,रामचंद्र गोरे,चेअरमन - रमेश काकडे,युवराज वराडे,यादवराव काकडे,तुकाराम वराडे,विश्वनाथ काकडे,ग्रामसेवक विनोद गायकवाड,नारायण लहाने,राजू वराडे,ज्ञानेश्वर गरुड,रामेश्वर वराडे,आदींसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें