येलदरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील निधी वाटपाची वरिष्ठां मार्फत चौकशी सुरू. परीचारिकांनि वाचला चौकशी अधिकाऱ्या समोर वैधकीय अधिकाऱ्याच्या मुस्कटदाबी चा पाढा.
अज़मत पठान.जिंतूर / प्रतिनिधी
तालूक्यातील येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैधकीय अधिकारी डॉ तौसिफ अन्सारी यांनी आठही उप केंद्रातील परीचारिकाना बळकटीकरणं व अबंधीतनिधी वाटप न केल्याची बातमी दै पुण्य नगरी या वर्तमान पत्रातून प्रकाशित होताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिनेश बोराळकर व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यल्यातील वरिष्ठ क्रमचार्यानी या सर्व प्रकाराची दोन दिवस चौकशी करून संबंधित पाच परीचारिकांचे लेखी जबाब घेतले आहे
या बाबत अधिक वर्त असे की तालुक्यातील येलदरी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत सांवगी म्हाळसा, येलदरी, केहाळ,बामणी, इटोलि,आंबरवाडी, भोसी,पिंपळगाव हे
आठ उप केंद्र असून या पैकी इटोलि वगळता इतर सात ही उपकेंदारातील कार्यरत परीचारिकांनी जिल्हा आरोग्य अधिकार्या कडे दि 27 एप्रिल 2018 रोजी बळकटी करणं व अबंधीत निधी मिळाला नसल्याची गंभीर तक्रार केली परंतु तक्रार करूनही आठ दिवस उलटले तरीही कोणतीही चौकशी झालि नसल्याने दै पुण्य नगरी वर्तमान पत्रातून दि 03 मे रोजी बातमी प्रकाशित होताच प्रशासन खडबडून जागे झाले व दि 04 मे रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिनेश बोराळकर यांनी तक्रार करणाऱ्या सहा आरोग्य उप केंद्रातील परीचारिकाची तोंडी चौकशी केली या वेळी वरील परीचारिकांनी त्यांना 2016-17 व 2017- 18 या दोन वर्षात बळकटीकरण व अबंधीत निधी मिळाला नसल्याचे सांगितले याच बरोबर उप केंद्रात निधी अभावी रुग्णांना सेवा देता येत नसल्याचेही सांगितले त्यावरून डॉ बोराळकर यांनी डॉ तौसिफ अन्सारी यांना निधी वाटपा विषयी विचारणा केली असता त्यांनी दि 31 मार्च 2018 रोजी पिंपळगाव वगळता इतर सातही उप केंद्राना सदरील निधी चेक क्रमांक 815961अनव्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा जिंतूर मार्फत प्रत्येकी पंधरा हजार रुपये संबंधितांच्या खात्यावर जमा करण्याचे बँकेला दिलेले पत्र दाखवले परंतु असे असले तरीही वरील आठही उप केंद्रातील कार्यरत परीचारिकांच्या खात्यावर ही रक्कम शुक्रवार दि 3 मे 2018 पर्यन्त जमा झाली नव्हती या बाबत डॉ बोराळकर यांनी डॉ तौसिफ अन्सारीला चांगलेच धारेवर धरले परंतु या चौकशी च्या वेळी येलदरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लेखापाल उपस्थित नसल्याने डॉ दिनेश बोराळकर हे उपस्थित परीचारिकाची चौकशी करून आले शनिवार दि 5 मे रोजी जिल्हा लेखा व्यवस्थापक लक्ष्मण पारीख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ नादुरकर, तालुका लेखापाल विजय ढगे यांनी वरील परीचारिकाची सखोल चौकशी करून त्यांचे लेखी जबाब घेतले असता उपस्थित पाच परीचारिकांनी आपल्या लेखी जवाबा मध्ये चौकशी आधीकार्यना 2016 -17 व 17-18 चा बळकटीकरण व अबंधीत निधी भेटला नसल्याने उप केंदारत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे लिहून देऊन मानव विकास कॅम्प होत नसल्याने गरोदर माता तपासणी होत नाही त्यामुळे प्रसूती च्या वेळी मोठा त्रास सहन करावा लागतो ऐन वेळी रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्यांचे बोलणे खावे लागते,पोलिओ लसीकरण चे अंगणवाडी मदत निस ला पैसे मिळत नाहीत,कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर सरकार तर्फे दिले जाणारे पैसे ही संबंधित रुग्णाल भेटत नाही,शस्त्रक्रिया गृहातील मदतनीस ला ही त्याचा मोबदला मिळत नसल्याचे लेखी जवाब दिला असून या सर्व प्रकारा नंतर दि 04 मे रोजी सदरील उप केंद्राच्या परीचारिकांच्या खात्यावर बळकटीकरण व अबंधीत निधी जमा झाल्याचे तालुका लेखापाल विजय ढगे यांनी सांगितले
या सर्व प्रकारा बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी दोषी वैधकीय अधिकारी व क्रमचार्यांवर कोणती कार्यवाही करतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे
अहवाल आज सादर करणार. येलदरी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत आठ उप केंद्राना बळकटीकरण व अबंधीत निधी का देण्यात आला नाही याची व इतर सर्व बाबीची चौकशी केली असून याच अहवाल आज सोमवार दि 7 मे रोजी जिल्हा आरोग्य अधिकार्या समोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली असून या बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी कोणती कार्यवाही करतात या कडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
चौकशी च्या वेळी लेखापाल गौरहजर . येलदरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील निधी वाटपा च्या चौकशी साठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिनेश बोराळकर व जिल्हयाचे पथक हे सलग दोन दिवस आले असता दि 4 व 5 मे या दोन्ही दिवशी संबंधित लेखपाल गैरहजर होते ते चौकशी समिती समोर आलेच नाही

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें