प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेसशी युतीची तयारी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 6 मई 2018

प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेसशी युतीची तयारी.

प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेसशी युतीची तयारी.


आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर युती करण्याची तयारी आहे, असे भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. मात्र त्याची सुरुवात या महिन्यात होणाऱ्या भंडारा पोटनिवडणुकीत भारिपच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन करावी, असे आवाहन त्यांनी कॉंग्रेसला केले आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर आंबेडकर रिपब्लिकन राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये दलित मते मिळविण्यासाठी त्यांच्या पक्षाबरोबर युती करण्याची काँग्रेसकडून चाचपणी करण्यात येत आहे. या संदर्भात आंबेडकर यांना विचारले असता, आगामी लोकसभा निवडणुकीत युतीस तयार आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत समझोता करणार नाही, असे त्यांनी स्पष्टकेले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें