आमदार विजय भांबळे यांचे तहसील कार्यालय वर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बहुसंख्य कार्यकर्त्यासह दोन तास ठिय्या आंदोलन.
जिंतूर (पठाण अजमत):
आ.विजय भांबळे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी २८ मे रोजी ११ वाजता तहसील कार्यालय जिंतूर येथे दोन तास ठिय्या आंदोलन केले. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करत भाजप- शिवसेना सरकारचा जाहीर निषेध केला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत सरकारच्या प्रतिकृतीस जोडे मारले. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध संमस्यांचे निवेदन शेकडो शेतकर्यांच्या स्वाक्षरीने तहसीलदार यांना देण्यात आले.
जिंतूर, सेलू बोरी,येथील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कोट्यावधीचा पिकविमा भरला आहे. साधरणतः शेतकऱ्यांनी प्रत्येकी ३०००/-, ४०००/-,५०००/- रु. या प्रमाणात पिकविमा भरणा केला आहे. परंतु विमा कंपन्यांनी पिक विम्याचा मोबदला देतांना अतिशय तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. अगदी २००/- रु. ३००/-रु. एवढी कमी रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करणाऱ्या कंपन्यावर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना त्त्यांच्या पिकविम्याचा योग्य मोबदला देण्यात यावा.
मतदार संघातील बोरी, जिंतूर, सेलू येथे तूर लागवड क्षेत्र जास्त होते. त्यानुषंगाने शेतकऱ्याचे तूर उत्पादन भरपूर प्रमाणात शिल्लक आहे. शासनाने सध्या तूर खरेदी केंद्र बंद केलेली आहे. साधारणतः फेब्रुवारी २०१८ मध्ये तूर खरेदी केंद्र सुरु केले. परंतु, आजपर्यंत फक्त २० ते २५ दिवसच सदरील खरेदी केंद्र सुरु होते. कोणत्या ना कोणत्या खाजगी कारणाने सदरील खरेदीकेंद्र वारंवार बंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्याकडे तूर विक्री साठी जावे लागले. खाजगी व्यापारी मनमानी भाव देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करीत आहेत. सद्यस्थितीत ६० % शेतकऱ्यांकडे तूर माल शिल्लक असल्यामुळे तूर खरेदी प्रक्रिया सुरु करण्याची गरज आहे. त्याचबरोबर शासनाने खरेदी केलेल्या शेतीमालाचे पैसे देण्यास ३ ते ४ महिन्याचा कालावधी लागत आहे. त्यामुळे शेतकरी अतिशय हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ देऊन मुख्यमंत्री साहेबांनी तूर खरेदी प्रक्रिया सुरु करावी.
मतदार संघातील बोरी, जिंतूर, सेलू येथे हरभरा खरेदी केंद्र सुरु असून सदरची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने होत असल्यामुळे ३० मे २०१८ या मुदतीत शेतकऱ्यांची हरभरा खरेदी होऊ शकत नाही. म्हणून मुख्यमंत्री यांनी हरभरा खरेदी केंद्रावर वजन काट्यांची संख्या वाढविणे तसेच खरेदी केंद्राला जागा अपुरी पडत असल्यास जागेची व्यवस्था करून हरभरा पिकांच्या खरेदीची मुदत वाढवून देऊन शिल्लक राहिलेल्या ७० % शेतकऱ्यांच्या हरभरा पिकांच्या खरेदी प्रक्रिया तत्काळ पूर्ण कराव्यात.
जिंतूर व सेलू तालुक्यात मागील वर्षी अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्याने पाण्याची पातळी अतिशय खोल गेली आहे. त्यामुळे यावर्षी ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई अत्यंत तीव्र झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते तीन कि.मी.पायी पायपीट करावी लागत आहे. त्यातच उन्हाच्या पाऱ्याने उच्चांक गाठला असून भर उन्हात पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. त्यासाठी नागरिकांनी टँकरची वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी करूनही शासन गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे तात्काळ टँकर सुरु करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यात यावा.
बोंडअळी अनुदानासासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांची पुरवणी यादी तयार करून कोणताही शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही याची दखल घ्यावी व ज्या शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले अश्या शेतकर्यांची अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात कपात न शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करण्यात यावी इ. मागण्या करण्यात आल्या.
जिंतूर सेलु तालुक्यात बऱ्याच दिवसापासून संजय गांधी योजना,श्रावण बाळ योजना,वर्धापकाळ योजनेपासून अनेक लाभार्थी वंचित ठेवण्यात आले आहेत. त्यांना तत्काळ वरील योजना प्रभावीपणे राबवून लाभार्थ्यांची निवड करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी.
यावेळी तालुका अध्यक्ष मनोज थिटे, जि.प.अध्यक्ष व्ही.पी.राठोड, जि.प.गटनेते अजय चौधरी, जि.प.सदस्य नानासाहेब राऊत, रामराव उबाळे, बाळासाहेब घुगे, विठ्ठल घोगरे, प.स.सभापती मधुकर भवाळे, उपसभापती विजय खिस्ते, प.स.सदस्य प्रकाश शेवाळे, किरणदाभाडे, गणेश इलग, शरद मस्के, मुंजाभाऊ तळेकर, दिलीपराव डोईफोडे, प्रल्हादराव ढोणे, न.प.अध्यक्ष कपिल फारुकी, न.प.उपाध्यक्ष बाळासाहेब भांबळे, न.प.सदस्य श्यामराव मते, मनोहर डोईफोडे, शाहेदबेग मिर्झा, दल्मीर पठाण, इस्माईल शेख, आहेमद बागबान, दत्ता काळे, शोएब जानिमिया, फेरोज कुरेशी, त्याचबरोबर शहर अध्यक्ष शौकत लाला, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मकसूद पठाण, आनंतराव देशमुख, अँड. विनोद राठोड, गणेशराव घुगे(इटोलीकर), सचिन स्वामी, संदीप राठोड, दत्ता लाटकर, सुधाकर जाधव, गजानन कांगणे, सचिन बोबडे, नंदू अंभूरे, रंगनाथ काळदाते, बी.जी.चव्हाण, दत्तराव काकडे, मधुकर कुकडे, दिनकर सातपुते, विलास वाघ, पडिप गडदे, रामेश्वर घुगे, रमेश ठोंबरे, भास्कर घुगे, यांच्यासह पक्षातील सर्व पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते सरपंच, उपसरपंच व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.Tezznews24 web news channel.
जाहिरात व बातम्यासाठि संपर्क.8888375846

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें