सावरगांव पवित्र रमजान महीण्या मध्ये नमाजे तराबी पढतांना मुस्लिम बांधव। - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 22 मई 2018

सावरगांव पवित्र रमजान महीण्या मध्ये नमाजे तराबी पढतांना मुस्लिम बांधव।

सावरगांव पवित्र रमजान महीण्या मध्ये नमाजे तराबी पढतांना मुस्लिम बांधव।


कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।

कन्नड तालुक्यातील सावरगांव येथे पवित्र रमजान महीण्या मध्ये संध्याकाळच्या सत्रा मध्ये नमाजे तराबी पढतांना मुस्लिम बांधव पवित्र रमजान व रोजा अल्लाहचा आदेश-
इस्लामच्या पाच स्तंभापैकी (अरकाने इस्लाम) ‘रोजा’ चौथे स्तंभ आहे. नमाज प्रमाणे रोजा पण पूर्व प्रेषितांच्या शरीयत (धर्मकायदात) मध्ये अनिवार्य राहिला आहे. पूर्वीचे लोकसमूह (राष्ट) पण रोजा धारण करत. त्याची गणती व तन्हा वेगळी असायची. रोजाचा मूळ उद्देश सर्वांकरिता एकच आहे।

 हल्लीच्या स्वरूपात लोकांकरवी भिन्नता आढळून येते. त्यामुळे रोजाचे मूळ स्वरूप हरपले अरबी भाषेत ‘सौम’ हा शब्द रोजासाठी येतो त्याचा शाब्दीक अर्थ रोखणे, थांबणे आहे. जी व्यक्ति खाणे-पिणेपासून स्वत:स रोखते त्यास अरबीत ‘सायम’ म्हणतात, (संयम हा शब्द बहुतेक याचाच अपभ्रंष असावा.) शरीअतच्या व्याख्येत पहाट प्रहरीपासून सूर्यास्तापर्यंत खाणे-पिणे, काम-वासनेपासून वर्ज राहण्याचे नांव सौम (रोजा) आहे. रोजे अनिवार्य असण्याचा हुकुम कुराणाद्वारे आहे।

 ‘‘हे इमानधारकांनो, तुम्हांवर रोजे पाळणे अनिवार्य आहे, पूर्वीच्या लोकांसाठी पण अनिवार्य होते. (रोजामुळे) त़कवा (ईश्वरभय) जीवनात प्राप्त होतो (कुराण २:१८३)’’. बुखारी व मुस्लिम या हदीसग्रंथात नमुद आहे, ‘‘इस्लामची मुलभूत श्रद्धा पाच आहेत. (१) अल्लाह एक आहे. त्याशिवाय कोणी उपास्य नाही. मुहम्मद (स.) अल्लाहचे प्रेषित आहेत. (२) नमाज (३) ़जकात (दान-धर्म) (४) रोजा पाळणे (५) हज करणे रमजान महिन्याचे रोजे पाळणे या श्रद्धेत संपूर्ण मुस्लिम समुदायाचे मतैक्य आहे. कोणीही मुस्लिम रोजा नाकारत नाही।

कोणी व्यक्ती रमजान-रोजाविषयी विरोधी असेल तर तो काफीर (ईशद्रोही) म्हटल जाईल. आचरण-उपलब्धता असताना जो रोजा टाळतो तो फासीख (अवज्ञाकारी) म्हटल जाईल दोन हिजरी सनात कुराणात रोजा कर्तव्य म्हणून आवश्यक ठरल्याची घोषणा झाली, आजारी,प्रवासी, गर्भवती, बाळास स्तनपान करणारी आई, शक्तिहीन वृद्ध लोवंâ अपवाद आहेत. रोजा भक्ती आहे. त्याबरोबरच मानसिक व शारिरीक प्रशिक्षणाचा भाग आहे. इच्छा-आकांक्षास क्रान्तीकारक वळण देणारी प्रक्रिया आहे।

 दुर्दैवी व्यक्तीच रोजाचा आदर करीत नाही भूतलावर मुस्लिम सर्वोत्तम समुदाय आहे. अल्लाहच्या आदेशानुसार, त्याच्या कायद्यानुसार जीवन जगणे त्याचे फलित आहे. ही वाट कसोटीची, संयमाची, धैर्याची आहे. यासाठी एक मोठी कार्यप्रणाली राबविण्याची तयारी ठेवावी लागते. यासाठी रमजान पर्व मांगल्याची मांदीयाळी आहे अल्लाहच्या प्रसन्नतेखातर जगणे-मरणे त्याची दिशा आहे. अल्लाहच्या आज्ञेनुसार बोलणे, चालणे, विचार करणे, कर्म करणे, वागणे यावर इमानधारक दृढनिश्चयी असतो।

रोजा पाळल्याने ही गुणवैशिष्ट्ये तो आपल्या राहणीमाना, चारित्र्यात, व्यक्तिमत्वात प्राप्त करतो. रमजान प्रवासात जीवन मार्गाची शिदोरी त्यास प्राप्त होते अल्लाहने रमजानपासून फलनिष्पत्ती प्राप्त करण्याची संधी आयुष्यात दिली आहे. पुढील वर्षीही संधी प्राप्तहोइल की नाही हे कोणी जाणू शकत नाही. आपलीपुंजी भरभरून प्राप्त करा. रोजापासून उर्जा प्राप्त करा. ध्येयपूर्तीसाठी वंâबर कसा. भरपूर तयारी करा.
रोजा आरोग्यवर्धक आणि ऐहिक लाभाबरोबरच अल्लाहवरील इमानमध्ये बळकटी व स्थैर्य आणतो।

प्रेषित मुहम्मद स. म्हणाले, ‘‘रमजान रोजे श्रद्धा व ईश्वरभयाने ईशपरायणतेने धारण करा. तुम्हास पापक्षालण होईल.’’ अल्लाहसाठी रोजे ठेवा. कृत्रिमपणा दिखाउ वृत्ती आणि गुन्ह्यांपासून लांब रहा. कर्तव्यपूर्तीतत कसूर करू नका. सकारात्मक, विधायक कार्य करा. नकारात्मक व बिघाड प्रवृत्तीचा त्याग करा. नसता रोजापासून पुण्याई व फायदा प्राप्त होणार नाही. रमजान पाहूणा आहे. पराकोटीचा पाहुणचार करा.
रोजेचे वैशिष्ट्य व महत्व-रोजा मुळ धारणेत आंतरिक बाबतीत अन्य उपासनेपेक्षा भिन्न आहे।

 नमाज अदा करताना उभे राहणे, झुकणं, सरळ होणे, नतमस्तक होणे ह्या क्रिया दिसणाNया आहेत. जकातविषयी घेणारा याचक परिचित होतो, हज उपासना लक्षावधी माणसात तो पार पाडतो परंतु रोजा अशी उपासना आहे ज्याची जाणीव भक्त व ईश्वर दोघांनाच राहते. रोजाची लोकांसमोर बतावणी होउ शकते, तो अप्रकटपणे खाउ-पिउ शकतो, त्याची ही क्रिया अल्लाहशिवाय कोणीच जाणू शकत नाही. प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘अल्लाह घोषणा करतो, रोजा निव्वळ माझ्यासाठी आहे।

मी त्याची अगणित परतपेâड करेन (सर्वसमंत हदीस).’’ प्रेषित म्हणाले, ‘‘माणसाच्या कर्माचा मोबदला दहा पटीपासून सातशे पट वाढविला जातो. परंतु अल्लाह फर्मावितो रोजाधारकांनी माझ्यासाठी रोजा स्वीकारला. खाणे-पिणे-भोग-इच्छा माझ्यासाठी वर्जित केल्या, म्हणून मी त्याचा मोबदला माझ्या अफाट, अमाप देणग्यांनी त्यास देईन रोजाधारकांसाठी दोन आनंदाचे क्षण आहेत. एक क्षण रोजा सोडताना (इफ्तार) व दुसरा क्षण मरणोत्तर जीवनात माझ्या भेटीप्रसंगी. रोजा धारकाच्या तोंडाचा श्वास अल्लाहकडे सुवासिक गंधापेक्षा उत्तम आहे।

 रोजा ढालीप्रमाणे आहे. (ही ढाल जगात गुन्ह्यांपासून, पापापासून व परलोकात नरकापासून बचाव करते.) जो कोणी रोजा पाळतो त्यांनी व्यर्थ, निरर्थक, अश्लिल गोष्टी करू नये, गोंधळ घालू नये. जर का दुसरा माणूस त्याच्याशी वाद घालेल, भांडणं करेल तेव्हा त्यांनी म्हणावे, ‘‘बाबा, मी रोजाधारण केलेला आहे.’’ (मी तुझ्याशी तत्सम म्हणजे तुझ्यासारखा वागणार नाही.)’’ (वरील सर्व हदीस संदर्भ- बुखारी व मुस्लिम ग्रंथ).
आदरणीय अबु अमामा यांनी प्रेषितांना प्रश्न केला, ‘‘मला असं एखादं कर्म सांगा जे केल्यानं अल्लाहकडून भरपुर प्रतिसाद मिळेल।

प्रेषित उत्तरले, ‘‘रोजा धारण करत जा, या तोडीचा अन्य कर्म नाही.’’ (संदर्भ निस्मह)
अबुहुरैरा कथन करतात, प्रेषितांशी सांगितले, ‘‘ज्या व्यक्तिने श्रद्धा व ईश्वराच्या मर्जीखातर रमजानचे रोजे पाळतो, त्यास क्षमादान मिळेल (बुखारी व मुस्लिम)’’.
सुहेल बीन साद कथन करतात, प्रेषित म्हणाले, ‘‘स्वर्गाच्या द्वारापैकी एक विशेष द्वार ‘रय्यान’ आहे. या दाराने केवळरोजाधारक प्रवेश करतील.त त्याशिवाय अन्य कोणीया दाराने प्रवेश करू शकणार नाही. हांक दिली जाईल की रोजेधारकांनी या द्वाराने स्वर्गात प्रवेश करावा. जेव्हा सर्व रोजाधारक आत प्रवेश करतील तेव्हा हा दरवाजा बंद केला जाईल. (संदर्भ बुखारी व मुस्लिम)’’.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें