बसच्या वाहक आणि चालक यांच्या बेशिस्त वागणुकीमुळे रुग्णाची गैरसोय. नारायण लोखंडे या तरुणाने बस थांबवून केली मदत. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 8 मई 2018

बसच्या वाहक आणि चालक यांच्या बेशिस्त वागणुकीमुळे रुग्णाची गैरसोय. नारायण लोखंडे या तरुणाने बस थांबवून केली मदत.

बसच्या वाहक आणि चालक यांच्या बेशिस्त वागणुकीमुळे रुग्णाची गैरसोय.

नारायण लोखंडे या तरुणाने बस थांबवून केली मदत.


प्रतिनिधी-शे.सलिम.

 7 मे रोजी रात्री भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे फाटीवर रात्री उशिरा एका दहा वर्षाच्या मुलाला नागीण हा आजार तसेच कान खूप दुखत असल्याने त्याला प्रचंड त्रास होत होता.त्याच्यासोबत त्या मुलाची आई आणि आजी होती.रात्र झाल्याने तेथे कुणीही थांबायला तयार नव्हते.अश्यावेळी नारायण लोखंडे या तरुणाने इतर वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र कुणीही थांबले नाही.अखेर 8:15 वाजता जालना ते सिल्लोड mh 06- S-8786 हि बस थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाने प्रतिसाद दिला नाही ,अखेर बसपुढे आडवे झाले व बस थांबवली ,आजी बसमध्ये बसत असतांना त्यांनी पुन्हा गाडी सुरु करुन निघाले असता नारायण लोखंडे या तरुणांने खिडकीला लटकून विनंती केली आणि बस थांबविली.मात्र यावेळी वाहक आणि चालक यांनी हि गाडी का रुग्णांना वाहण्यासाठी आहे का? खाजगी वाहने लावता येत नाही का? असे प्रश्न उपस्थित करून रुग्णाबद्दल सहानुभूती दर्शविली नाही.मात्र वेळेचे बंधन ठेवून वाहकासोबत वाद न घालता त्यांना बसमध्ये बसवूंन दवाखान्यात नेण्यास सहकार्य केले.नंतर या तरुणाने रात्री 8:45 वाजता बसस्थानक कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्या मुलाच्या आजीने नारायण लोखंडे या तरुनाचे खूप आभार मानले.
अश्या या माणुसकी न जपणाऱ्या कर्मचाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी भोकरदन तालुक्यातील सर्व तरुणांनी भोकरदन बसस्थानिकातील नियंत्रक एन.डी.राऊत यांच्याकडे  8 मे रोजी निवेदन देऊन तक्रार केली.तक्रारीत नमूद केलेले आहे की अश्या कर्मचाऱ्यांना माणुसकी जपली नाही तसेच प्रवंशाच्या भावना दुखावल्या असल्यामुळे त्यांना योग्य तो समज घालून कार्यवाही करावी अन्यथा बसस्थानकासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा सर्व तरुणांनी दिला.निवेदनावर नारायण लोखंडे,समाधान लोखंडे,दिपक जाधव,आप्पासाहेब जाधव,संदिप भोकरे,किरण सहाणे,अनिल गिरणारे, शिवराम जऱ्हाड,अनिल भुतेकर,काकासाहेब लोखंडे,बंडू जाधव,अजिनाथ साबळे आदी तरुणांच्या सह्या आहेत.

प्रतिक्रिया- माणसांनीच मांनसासाठी थांबायचे नाही तर मग आपण अपेक्षा ठेवायच्या तरी कुणाकडून? असेच जर अपंगासोबत,वृध्दासोबत ,रुग्णासोबत होत असेल तर ही गोष्ट माणुसकी जपणारी नाही.वाहक आणि चालक यांनी सहकार्य करणे दूरच अरेरावीची भाषा वापरली.जर मी तेथे नसतो तर अश्या वागणुकीमुळे नक्कीच त्यांना दवाखान्यात येण्यास अडथळा निर्माण झाला असता.यापुढे असे कुणासोबतही होऊ नये यासाठी वरिष्टानी लक्ष घालण्याची गरज आहे.रात्रीचा वेळ असल्याने वाहकाडून व चालकाकडून हि अपेक्षा नव्हती.नारायण लोखंडे- बरंजळा लोखंडे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें