जिंतूर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करून हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी.
न प मुख्याधिकऱ्यांना निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा.
जिंतूर प्रतिनीधी.अज़मत पठान.
शहरात मागील काही दिवसांपासून अनियमित तसेच आठवड्यातून एकदाच तो ही कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे म्हणून शहरातील नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत शिवाय पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप करत कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून निलंबीत करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचा वतीने 24 मे रोजी नगरपरिषदेच्या मुख्याधिकऱ्यांनकडे निवेदनाद्वारे केली आहे
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील हुतात्मा स्मारक,आनंद नगर,शिवाजी नगर, चपराशी कॉलनी,आदर्श कॉलनी ,नामदेव नगर,ग्रीन पार्क परिसर या भागात आठवड्यातून केवळ एकदाच पाणी पुरवठा होत असून तोही कमी दाबाने होत आहे यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे त्यातच सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना व हिंदू धर्मातील अधिक मास असल्याने रोजच विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात या कार्यक्रमासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते मात्र पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी पणामूळे नागरिकांना भर उन्हात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे यात पाणी पुरवठा करणारे कर्मचारी श्री बोराडे व शिनगारे यांच्या अडमुठे धोरणामुळे यलदरी धरणात मुबलक पाणी असतानाही नियोजन शून्य कारभार व हलगर्जी पणामुळे वेळेवर नागरिकांना पाणी मिळत नाही आणि सोडले तर कमी दाबाने व अर्धा तासच पाणी सोडने हे नेहमीचेच झाले आहे त्यातच ते नेहमी सर्वसामान्य नागरिकांना तुच्छ वागणूक देत आहेत तसेच नागरिकांनी पाणी कधी सुटणार विचारले तर वेळ खोटी सांगणे तसेच शहरातील नागरिकांनी त्यांना जाब विचारलाच तर जा तुम्हाला काय करायचे ते करा माझे तुम्ही काही वाकडे करू शकत नाहीत अशी भाषा वापरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे म्हणून अशा मुजोर कर्मचाऱ्यांची चौकशी करून निलंबित करावे व शहराला सुरळीत पाणी पुरवठा करावा
अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा करण्याचा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर तालुका अध्यक्ष बाळासाहेब काजळे,सोपान प्रल्हाद धापसे,सुरेश नामदेव तावडे,प्रभाकरराव देशमुख,एन व्ही रोडे,एम एच तापोंनकर,एन आर वलशिंगीकर,बाळासाहेब पेनुरकर,रवींद्र रणशिंग,दाभाडे एम व्ही,सुरेश नवले,विजय मोरे,गजानन डहाके,विनोद पाचपिले,अमोल माने,संजय खिल्लारे,प्रमोद वाव्हले,अविनाश गवई,विवेक धकरगे आदींचा सह्या आहेत

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें