स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मानवतरोड येथे रास्ता रोको आंदोलन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 16 मई 2018

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मानवतरोड येथे रास्ता रोको आंदोलन.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मानवतरोड येथे रास्ता रोको आंदोलन.

मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.१६: शेतकऱ्यांच्या  विविध मागण्यांसाठी आज  बुधवार दि १६ मे रोजी मानवत  तालुक्यातील मानवत रोड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव निर्वळ यांच्या नेतृत्वाखाली एक तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सोयाबीन व  इतर पिक विमा फसवणूक केलेल्या रिलायन्स कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा,बोल्ड अळीचे हेक्टरी ४०००० रु.अनुदान तत्काळ देण्यात यावे. शेती पंपासाठी मोफत विज. नवीन पीककर्ज तत्काळ देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी मानवतरोड येथील सेलू फाट्यावर सकाळी १० वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. एक तास आंदोलन करण्यात येऊन पोलीस निरीक्षक पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनात सुकाणु समितीचे अध्यक्ष बालासाहेब आळणे, ज्ञानेश्वर निर्वळ, विक्रम निर्वळ, डी. के. भिसे, संजय देशमुख, आश्रोबा खरात, सरपंच राजेश कुकडे, ज्ञानोबा निर्वळ, कृष्णा मांडे, मगर  आदी सहभागी झाले होते. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान यामुळे  वाहनांच्या दुतर्फा रांगा मोठ्याप्रमाणात  लागल्या होत्या.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें