शिर्डी / महाराष्ट्र पञकार संघातर्फे खंडोबा मंदिर देवस्थान शिर्डी चे श्री अजय नागरे यांना धार्मिक क्षेत्रातील समाज सेवक पुरस्कार प्रदान. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 16 मई 2018

शिर्डी / महाराष्ट्र पञकार संघातर्फे खंडोबा मंदिर देवस्थान शिर्डी चे श्री अजय नागरे यांना धार्मिक क्षेत्रातील समाज सेवक पुरस्कार प्रदान.

शिर्डी / महाराष्ट्र पञकार संघातर्फे खंडोबा मंदिर देवस्थान शिर्डी चे श्री अजय नागरे यांना धार्मिक क्षेत्रातील समाज सेवक पुरस्कार प्रदान.

प्रतिनिधी.शिर्डी.
राज दुनबळे.
महाराष्ट्र पञकार संघातर्फे श्रीरामपुर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात शिर्डी येथील खंडोबा मंदिर देवस्थानचे विश्वस्त अजय मनोहर नागरे यांना धार्मिक क्षेत्रातील समाज सेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नागरे यांनी शिर्डी येथे येणाऱ्या पालखी पदयाञेकरुंसाठी मोफत अन्नदान, शिर्डी ते जेजुरी पदयाञेचे आयोजन तसेच व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून शेकडो व्यक्तींना व्यसनमुक्त करुन समाजापुढे ऐक आदर्श उभा केला आहे. त्यांच्या या धार्मिक सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताञय खेमनर यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र पञकार संघाचे राज्य अध्यक्ष विलास कोळेकर आणि मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला*
*महाराष्ट्र पञकार संघातर्फे उत्तर महाराष्ट्र विभागीय उन्हाळी एक दिवशीय कार्यशाळा मंगळवार दिनांक १५/५/१०१८ रोजी  अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर तालुक्यातील लक्ष्मी हाँलीडे टुरिझम येथे सकाळी  ११ ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेसाठी अन्य विभागातील पत्रकारही उपस्थित  होते महाराष्ट्र पञकार संघाचेl राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर साहेब  ,राज्य प्रमुख संघटक शिरीष कुलकर्णी,राज्य संपर्क प्रमुख बाबासाहेब राशिनकर,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देविदास बैरागी,उपाध्यक्ष रामनाथ जऱ्हाड, प्रांतिक सदस्य सुनिल कुमावत, डी. बी. कादरी,अशोकराव दुसिंग,निलेश वाघ,निलेश परबत अशोक शिंद दैनिक लोकमंथन चे उपसंपादक बाळासाहेब शेटेआदी मान्यवरांनीउपस्थित राहून मार्गदर्शन केले, त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सन्मान करण्यात आला तर पत्रकारांना मोफत उन्हाळी कॅपचे वितरण करण्यात आले कार्यशाळा यशस्वितेसाठी महाराष्ट्र पञकार संघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री दत्तात्रय खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली इले . मिडिया जिल्हाध्यक्ष जयेश सावंत छायाचित्रकार जिल्हाध्यक्ष किरण शेलारअहमदनगर जिल्हा सचिव राजेंद्र बनकर, जिल्हा संपर्क प्रमुख साईप्रसाद कुंभकर्ण, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र उंडे, उपाध्यक्ष अमोल राखपसरे, दिलीप लोखंडे, संघटक राजेंद्र दुनबळेश्रीरामपूर तालुका अध्यक्ष साईनाथ बनकर, राहाता तालुका अध्यक्ष अरुण बाबर,राहुरी तालुका अध्यक्ष राजेंद्र साळवे, भारत म्हसे,रविंद्र उगलमूगले,किरण जगताप व त्यांचा सर्वच सहकारी पत्रकार मित्रांनी मेहनत घेतली  विविध दैनिकाचे साप्ताहिकाचे वृत्त वाहीन्यांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित राहून या कार्यशाळेचा लाभ घेतला*

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें