प्रज्ञाशोध परीक्षेत नूतन चे विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम.
आदित्य खरात, शालिनी कांदळे.
सेलू__(समशेर खान ) जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाअंतर्गत घेण्यात आलेल्या प्रज्ञा शोध परीक्षेत नूतन विद्यालय च्या मुले/मुलीनी यश संपादन केले . प्रज्ञा शोध परीक्षेत सातवीतून चि.आदित्य खरात व नववीतून कु. शालिनी कांदळे जिल्ह्यातुन सर्व प्रथम येण्याचा मान पटकावला व शिष्यवृत्तीस पात्र ठरले . सहावीतून चि. पार्थ ईक्कर व चि. रणखांबे प्रणय पाचवा आला. नववीतून चि. सौरभ कुलकर्णी जिल्ह्यातुन दुसरा चि. ओंकार लटपटे चौथा चि. परेश पाटवकर सातवा येऊन शिष्यवृत्तीस पात्र ठरले . सर्वांना श्री कुशल कडे व सुधीर जोशी यांचे मार्गदर्शन लाभले .या घवघवीत यशा बदल संस्थाध्यक्ष डॉ. एस.एम लोया, उपाध्यक्ष अँड वंसतराव खारकर मामा , चिटणीस डी.के.देशपांडे , सहचिटणीस डॉ. व्ही. के. कोठेकर, जयप्रकाशजी बिहाणी , प्रशालेचे मुख्याध्यापक के.व्ही. वाघमारे , उपमुख्याध्यापक अनिल कुलकर्णी , पर्यवेक्षक अशोक गाजरे, मा.मा. सुर्वे यांनी अभिनंदन व कौतुक केले. नूतन विद्यालयात विविध परिक्षेत यशाची पंरपरा कायम ठेवली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें