मानवत येथे राञी एक वाजता रोजा होणार आसल्याचे जाहीर ! मध्यरात्री रोजा व तरावीची नमाजचे जाहिर झाल्याने मुस्लीम बांधवाची धावपळ. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 17 मई 2018

मानवत येथे राञी एक वाजता रोजा होणार आसल्याचे जाहीर ! मध्यरात्री रोजा व तरावीची नमाजचे जाहिर झाल्याने मुस्लीम बांधवाची धावपळ.

मानवत येथे राञी एक वाजता रोजा होणार आसल्याचे जाहीर !

मध्यरात्री रोजा व तरावीची नमाजचे जाहिर झाल्याने मुस्लीम बांधवाची धावपळ.

मानवत / मुस्तखीम बेलदार.
दि.१७: मुस्लीम धर्मियाचा पविञ असा रमजान महिना दि.१७ मे पासुन सुरु होणार होता परंतु चंद्र दर्शन न झाल्यामुळे व संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास आभाळ आल्याने व पाऊस पळल्यामुळे चंन्द्र दर्शन मानवत व परिसरात झालेच नाही त्यामुळे मानवत येथील धर्मगुरु मुफ्ती मोहम्मद ईसाक साहेब व जबाबदार व्यक्तिनी हिलाल कमीटी ईमारते शरीया औरंगाबाद व आजुबाजुच्या जिल्हयात व संपर्क केला पण चंन्द्र दर्शन झाले नसल्याचे कळाले यामुळे आजचा रोजा (उपवास)व तरावी नमाज न करण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु राञी १ च्या सुमारास हिलाल कमीटी ईमारते शरीया औरंगाबाद यांनी  चंन्द्रदर्शन झाल्याचे कळविल्यानंतर नंतर शहरातील जबाबदार व्यक्तिनी मानवतचे धर्मगुरु मुफ्ती मोहम्मद ईसाक साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी तात्काळ बैठक घेत तरावीची नमाज व रोजा (उपवास)आज होणार आसल्याचे जाहीर केले व राञी मस्जीतीतुन लगेच संदेश देऊन नागरिकांना तरावीच्या नमाजसाठी बोलवण्यात आले यामुळे झोपेत आसलेल्या नागरीकाची चागलीच धावपळ उडाली व लगेच मुस्लीम बांधवानी मस्जीद गाठली व तरावीच्या नमाज अदा केली व  नंतर रोजा (उपवासाच्या) तयारीला मुस्लीम  बांधव  लागले होते व मोठ्या उत्साहात तरावीची नमाज मुस्लीम बांधवानी यावेळी अदा केली व आज रोजी पहिला रोजा (उपवास )संपन्न झाला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें