पवित्र रमजान महिन्यात भारनियमन बंद करण्याची मागणी.
महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानच्या वतीने
ऊर्जा मंत्रीकडे मागणी.
भोकरदन प्रतिनिधी : महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान भोकरदन च्या वतीने रमजान महिन्यात भारनियमन बंद करण्यात यावे या संबंधिचे निवेदन भोकरदनचे उपविभागीय अधिकारी साहेब व सहाय्यक अभियंता यांच्या मार्फत महाराष्ट्र ऊर्जा मंत्री यांना देण्यात आले. मस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना दिनांक १६ मे पासून आरंभ झाला आहे, अनेक वर्षा नंतर भर उन्हाळयात मे महिन्यात रमजान आले आहे उन्हाची तीव्रता खूप आहे व उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तापमानात फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. रमजान महिन्यात रोजदारांना ह्या महिन्यात दररोज सकाळी पहाटे चार वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजे पर्यंत रोजा धरावे लागते तसेच दररोज तराबिह नमाज म्हणजे रोज कुराण मधिल एक अध्याय करून तीस अध्याय पूर्ण महिन्यात करावे लागते व अनेक धार्मिक कामे करावी लागतात तरी आमची मागणी आहे की महाराष्ट्रात कुठेही भारनियमन करू नाही वो लाईट काई करना मुळे गेली तर ताबड़ तोप चालु करण्यात यावीअशी मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी भोकरदन यांच्या मार्फत ऊर्जा मंत्री यांना देण्यात आले.निवेदनावर महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानचे ता.अध्यक्ष शेख सलीम करीम,जिल्हाउपाध्यक्ष इसरार पठाण,शेख अन्सार,शेख मुक्तार,आसिफ कुरेशी(गज्जू अण्णा), नुझेर शाहा ,झाहेद शेख ,शेख निसार ,जुबेर कुरेशी, नासेर बिल्डर,कलिम भाई,अकबर शेख ,जावेद पठाण,अकिल कासमी,रिझवान बिल्डर,शेर खान मुजाहेद पठाण,एजास पठाण,शेख नसीम,सलमान शेख,मुस्तकीम शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें